T20 World Cup final: विजयानंतर चक्क बुटात दारू ओतून प्यायले ऑस्ट्रेलियन खेळाडू; धक्कादायक कारण आले समोर

0

दुबईमध्ये आयोजित केलेली टी20 विश्‍वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर करत आयसीसी ट्रॉफीचे बादशाह आम्हीच असल्याचे, पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. Australia won the T20 world cup ‘अॅरोन फिंच’च्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदाच टी20 विश्‍वचषक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया या विश्वचषकाचा प्रमुख दावेदार नसल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. त्यामुळे या विजयाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. मात्र याच्या पेक्षाही आॅस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं, त्याच्या, चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

दुबईत झालेला टी-20 विश्वचषकामध्ये बऱ्याच सामन्यात धावांचा पाठलाग करून अनेक संघ विजय झाल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करावी, म्हणजे धावांचा पाठलाग करताना दबाव येत नाही, असं बोललं जातं. मात्र यावेळी हे चित्र उलट झाल्याचं पहिला मिळालं. अनेकांनी धावांचा पाठलाग करणं पसंत केलं, आणि यात यश देखील मिळावल्याचे दिसून आले. दोन्हीं सेमी फायनल सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना,इंग्लंड आणि पाकिस्तानने मोठी धावसंख्या उभारून देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

दोन्हीं सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने धावांचा पाठलाग करत फायनलमध्ये धडक मारली, हे आपण पाहिलं. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड फायनलमध्ये पोहचतील, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र ही किमया या दोन्हीं संघांनी करून दाखवली. या दोन संघापैकी आता विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र काल अखेर न्यूझीलंड संघाचा पराभव करत ऑस्ट्रेलिया या फॉर्मेटमध्ये पहिल्यांदाच विश्वविजेता बनला.

खराब सुरुवातीनंतर देखील न्यूझीलंडचा कॅप्टन ‘केन विल्यम्सन’ने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर उभा केला. विजयसाठी आवश्यक असणारे १७३ धावांचे आव्हान, ऑस्ट्रेलियन संघाने सहज पूर्ण केले. लागोपाठ दोन अर्धशतक ठोकत डेव्हिड वॉर्नरने “फॉर्म इज टेम्पररी क्लास इज पर्मनंट” हे पुन्हा एकदा दाखवून दिले. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी मिचेल मार्शला तिसरा क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र या सगळ्यांच्या मुस्काटात मारत, मिचेल मार्शने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत, ऑस्ट्रेलियाला एकहाती विश्वचषक जिंकून दिला.

ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला, मात्र याच्यापेक्षा देखील जास्त चर्चा झाली तीऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनची. ऑस्ट्रेलियन संघाने विजयानंतर जे सेलिब्रेशन केलं आहे, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडूंनी विजयानंतर पायातला बुट काढला,त्यात बाटलीतील बियर ओतली, आणि तिच बियर घशातून आत उतरविली. आॅस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी केलेल्या या सेलिब्रेशनची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सेमीफायनल सामन्यातले ऑस्ट्रेलियाचे दोन हिरो ‘मॅथ्यू वेड’ आणि ‘मार्कस स्टोइनिस’ या दोघांनी ‘शूज’मध्ये बियर ओतली, आणि तिच बियर चक्क तोंडात ओतत घटाघटा पिल्याचा अजब प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ आयसीसीने ट्वीटरवरून पोस्ट केला आहे. मार्कस स्टोइनिस आणि मॅथ्यू वेड या दोघांनी केलेलेहे अनोखे सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी या सेलिब्रेशनचे कौतुक केले आहे, तर काहींनी मोठ्या प्रमाणात टिकाही केली आहे.

https://twitter.com/T20WorldCup/status/1460057210441146371?t=eh7H02NNlHLPD0LVkpUApQ&s=19

बुटामध्ये बिअर टाकून पिण्याचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नाही, मात्र वर्ल्डकप जिंकल्यानंतर तुझ्या बुटात बियर टाकून पिऊया, असं ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांना म्हटले अशी चर्चा आहे. सोशल मिडीयावर असं बोललं जातंय, मात्र असं काही ठरलं नसावं, सेलिब्रेशन करताना त्यांना सुचलेली ही एक अक्कल असू शकते, असेही बोलले जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.