२०१४ पूर्वी गॅस दरवाढीविरोधात स्मृती इराणी सिलेंडर घेऊन रस्त्यावर नाचत होती; एकेरी उल्लेखामुळे राजकारण तापलं

0

वाढत्या महागाईमुळे शिवसेनेने काल औरंगाबादमध्ये केंद्र सरकार विरोधात आक्रोश मोर्चा काढला होता. या आक्रोश मोर्चाला शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या आक्रोश मोर्चाला संबोधित करताना, केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचे सरकार असताना, आंदोलन करणारी मंडळी आता कुठे आहेत? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर पुन्हा एकदा स्मृती इराणीवर एकेरी भाष्येचा वापर करत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला देखील चढवल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबादमध्ये काल शिवसेनेने खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित देखील झाले होते. आक्रोश मोर्चाला संबोधित करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवत, अनेक विषयांवर भाष्य केले. परवानगी नसताना देखील काढलेल्या आक्रोश मोर्चाची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या दिड-दोन वर्षापासून संजय राऊत राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा खूप मोठा हात होता. आणि तेव्हापासून संजय राऊत भारतीय जनता पार्टीवर सातत्याने हल्ला चढवताना पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या आक्रोश मोर्चात देखील संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विविध विषयांवर भाष्य करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार महागाई, बेरोजगारी हाताळण्यात किती अपयशी ठरलं आहे, हे सांगितलं.

एकीकडे केंद्र सरकार महागाई बेरोजगारी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचबरोबर कोरोणा घालवण्यासाठी काही ठोस उपाय योजना न करता, टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगितले. टाळ्या, थाळ्या वाजवून कोरोना जात नसतो. अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. केंद्र सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी ठरलं, मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात उत्तमरित्या राज्य सांभाळलं. ठोस उपाययोजना राबवल्या, असंही सांगितलं.

औरंगाबादमध्ये आयोजित केलेला आक्रोश मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत यांनी खास करून महागाईच्या प्रश्नावर केंद्र सरकारला चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळाले. २०१४ पूर्वी ज्यावेळेस काँग्रेस सरकार केंद्रात होतं, त्यावेळेस भाजपचे अनेक नेते इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरायचे. मात्र आता त्यांना महागाई दिसत नाही, असा घणाघात त्यांनी केला. काँग्रेसचं सरकार असताना, गॅस दरवाढीविरोधात स्मृती इराणी रस्त्यावर गॅस घेऊन नाचत होती. नक्की कोणता सिलेंडर माहीत नाही, पण सिलेंडर घेऊन रस्त्यावर आली होती. असा एकेरी हल्ला संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीवर केला.

संजय राऊत यांनी स्मृती इराणी यांना यापूर्वीदेखील टार्गेट केलं होते. शिक्षकाचा काहीही संबंध नसणार्‍या माणसांना केंद्र सरकार शिक्षण मंत्री बनवत असल्याचा, घणाघात त्यांनी यापूर्वी केला होता. श्रुती इराणी देखील एक वेळा शिक्षण मंत्री होत्या. याचाच हवाला देत, संजय राऊत यांनी स्मृती इराणी शिक्षण मंत्री होण्यापूर्वी मॉडेलिंग करत होत्या. अशा लोकांना भारतीय जनता पार्टी शिक्षणमंत्री बनवत असल्याचा, घणाघात त्यांनी केला होता. स्मृती इराणी यांच्यावर टीका केल्यानंतर, संजय राऊत यांचा चित्रा वाघ यांनी समाचार घेतल्याने राज्यात चांगलंच वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.