छत्रपतींचा सेवक साक्षात शिवछत्रपतींची सेवा करायला निघाला, बाबासाहेब मला पितृसमान; भावपूर्ण श्रद्धांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काही दिवसांपासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु होते. त्यांना ICU विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांनी आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास सोडला. त्यांचे आज सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. त्यांचे वय १०० वर्ष एवढे होते.
त्यांनी आपल्या वाणीने शिवचरित्र महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचवले. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखन बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे. तसेच ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखन आणि दिग्दर्शन सुध्दा त्यांनी केले आहे. बाबासाहेब मोरे यांचे खरे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे आहे. परंतु लोक त्यांना बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे. नुकतच बाबासाहेब पुरंदरे यांचा 100 वा वाढदिवस पार पडला होता.
29 जुलै 2021 या दिवशी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा बाबासाहेब पुरंदरे यांना व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा व त्यांचे कौतुक केले होते. मोदींनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना छ्त्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव आपल्या व्हिडिओमध्ये मांडला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाबासाहेबांनी आपले आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हाने याबाबत त्यांनी कायम मार्गदर्शन केलं. माझ्या वयक्तिक आयुष्यात ते माझे मार्गदर्शक देखील होतेच परंतु मला ते पितृतुल्यही होते.
महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला आहे, तिथेतिथे मी अनेकदा अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे. महाराज जिथे जायचे तिथे जायची. छत्रपतींचा सेवक साक्षात शिवछत्रपतींची सेवा करायला निघाला. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Sharad Pawar: राज्यात दंगली शरद पवार यांच्या आशीर्वादानेच;जेव्हा-जेव्हा शरद पवारांचे सरकार येते, तेव्हा अश्या दंगली घडतातच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम