Amravati violence: अमरावती ‘हिं’साचार प्रकरणात भाजपचा पहिला बळी; ‘या’ मोठ्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0

त्रिपुरामध्ये अल्पसंख्यांकांवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटल्याचे दोन दिवसापूर्वी पाहायला मिळाले. खासकरून अमरावतीत यांचे तिव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. अमरावतीत काही ठिकाणी दगडफेक, दुकानांची तोडफोड,तर काही गाड्या देखील जाळण्यात आल्या. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी या हिंसाचाराला एकमेकाला जबाबदार धरत आरोप प्रत्यारोप केले. आता अमरावती पूर्वपदावर आली असून, पोलीसांनी संबंधितांना अटक देखील करायला सुरुवात केली आहे.(Amravati police)

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय (Sanjay Raut) राऊत यांनी तर, या प्रकरणाला भाजपला जबाबदार धरल होतं. नुकत्याच झालेल्या १३ राज्यांच्या पोट निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनात अस्थिरत निर्माण झाली आहे. हिंदू- मुसलमान हिंसाचार, जाती-जातीत तेढ निर्माण करायचा, ही त्यांची जूनी हत्यारे आहेत. आणि आता तिच बाहेर काढली असल्याचा, गंभीर आरोप संजय राऊत यानी भाजपावर केला होता.

तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे(Anil bonde,) यांनीदेखील अनेक गंभीर आरोप केले. एवढेच नाही तर त्यांनी थेट शरद पवार(Sharad Pawar) यांनाच या प्रकरणात ओढत, गंभीर आरोप केले. अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करताना म्हटले, जेव्हा तेव्हा महाराष्ट्रात त्यांचं सरकार येतं, तेव्हा-तेव्हा असे हिंसाचार होतात, असं धक्कादायक वक्तव्य केलं. त्याचबरोबर अमरावती, नांदेडमध्ये होत असलेला हिंसाचार देखील शरद पवार यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचं, धक्कादायक वक्तव्य देखील त्यांनी दोन दिवसापूर्वी केलं होतं.

‘त्रिपुरा’मध्ये (Tripura) अल्पसंख्यांकवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. जिल्हाधिकार्‍यांना निवेदने दिली. मात्र घरी जात असताना चित्रा चौक, तसेच काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली, या मोर्चाला हिंसक वळण मिळाले. यानंतर अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. उद्या अमरावती बंद झालंच पाहिजे, मी उद्या सकाळी ९.३० वाजता ‘राजकमल चौक’ येथे येत आहे, आपणही या. उद्या अमरावती बंद झालंच पाहिजे. असा संदेश त्यांनी दिल्यानंतरच परिस्थिती चिगाळल्याचं बोलंल जात आहे.

अमरावती झालेला हिंसाचार भडकवल्या प्रकरणी अमरावती पोलिसांनी अनिल बोंडे यांना आज सकाळी अटक केली असल्याची माहिती मिळते. जमावबंदी लागू केली असताना देखील, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन केल्याचं पोलीसांनी सांगितले. आणि याच प्रकरणामुळे अनिल बोंडे यांना अटक केल्याची माहिती मिळते. मात्र अनिल बोंडे यांनी हे सरकार हिंदू विरोधी असून हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. आणि त्यातूनच हि अटक झाली असल्याचं त्यांनी एका राम भक्ताच्या ट्वीटला रिट्विट करत माहिती दिली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.