Peth Shahar: पेठचे तळे होऊ शकते सारसबाग; पेठ प्राचिन तळाची अवस्था दयनीय

0

 

पेठ प्राचिन तळाची अवस्था दयनीय

जलपरीषदची सुशोभीकरण करण्याची मागणी पेठ ( Peth Shahar) शहरात बसस्थानक लगद ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले प्राचिन तळे आहे. परंतु अद्याप या तळ्याची अवस्था दयनीय झालेली आहे पुढील काळात या स्थळाचा विकास व्हावा यासाठी आपण लक्ष द्यावे खेळताना नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेचा समावेश करून तळ्यात बोट क्लब सुरु करण्यात यावे तळे परीसरात उद्यानाची निर्मिती करावी जेणेकरून परीसरात स्वच्छता कायम राहील यासाठी आज जलपरीषद मित्र परिवार पेठ तर्फे निवेदन देण्यात आले

पेठ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन तळे इतिहासाची साक्ष देत असतानाच या तळ्याची सद्यस्थितीत झालेली दुरवस्था व परीसरातील घाणीचे साम्राज्य पाहता पुण्याच्या गटारगंगेतुन सारसबागची निर्मिती होऊ शकते तर मग पेठच्या तळ्याची सारसबाग का होऊ शकत नाही असा सवाल नागरीकांनी व जलपरीषद ने केला आहे

तळाल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येत आहे पुर्वीच्या काळी पेठ हे संस्थान होते अहमदनगर च्या निझामशाहाचे मांडलिक असलेले हे संस्थान होते त्या काळी या तळ्याची निर्मिती केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे तसेच तलावाच्या काठावर जुन्या पद्धतीच्या खोदलेली बारव विहीर आजही असुन त्याचे बांधकाम ही जुन्या चुन्याच्या व कोरीव दगडांच्या सहाय्याने करण्यात आले आहे या बारववरुन महीला पाणी भरत असत शिवाय जनावरांना ही विहीरीत उतरुन सहज पाणी पिता यावे यासाठी पायऱ्या करण्यात आल्या होत्या
तळ्याच्या काठावर पुरातन जागृत शिवमंदिर आहे तर पश्चिमेला पवनपुत्र हनुमान मंदिर आहे आहे अतिशय निसर्गरम्य परीसर असताना केवळ दुर्लक्षामुळे व विकासाची नवी दिशा नसल्याने या चांगल्या परीसराला अवकळा आल्याचे दिसून येते मंदीराचे बांधकाम हेमाडपंती आहे

लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज
पेठ शहराच्या विकासात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक तळ्याच्या विकासासाठी गाव ते केंद्रस्तरावरील लोकप्रतिनिधी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे तरच या तळ्याच्या विकासासाठी प्रयत्न केल्यास आगामी काळात या ठिकाणी पेठ शहराला व तरुणांना रोजगाराला चालना देणारी जागा असणार आहे.

या प्रसंगी जलपरीषद चे देविदास कामडी ,गणेश भाऊ गवळी ,भिकन शेख ,गणेश सातपुते ,अशोक गवळी ,राहुल मानभाव ,अरून सुबर ,वैभव सातपुते ,धनराज वाघमारे राजेंद्र गायकवाड,
देविदास चौधरी,हुशार टोपले, गिरीष डोळे,दिनकर गवळी ,किरण पवार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.