Smriti Mandhana marriage date: स्मृती मंधानाचं ठरलं! या व्यक्तीबरोबर करणार शाही विवाह सोहळा..

0

Smriti Mandhana marriage date: भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आपल्या आकर्षक फलंदाजी बरोबर सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. स्मृती मंधानाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. भारतामध्ये क्रिकेटची खूप मोठी क्रेझ आहे. केवळ पुरुषांनाच चाहते लाईक करतात, असे नाही. तर महिलांची फॅन फॉलोइंग देखील खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं.

फलंदाजीबरोबर स्मृतीच्या सौंदर्याचे देखील प्रचंड दिवाने आहेत. स्मृतीच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन सोशल मीडियावर अनेकदा मोठ्या प्रमाणात वायरल केले जाते. स्मृतीच्या मैदानाबाहेरील कृत्यावर देखील अनेकांची नजर असते. स्मृती सध्या आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली असून, प्रकरण थेट मांडवापर्यंत पोहोचलं आहे.

सेलिब्रिटी आणि क्रिकेटर आपलं खाजगी आयुष्य मीडिया आणि लोकांपासून नेहमी लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकांच्या नजरा सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांच्याकडे असल्याने, कोणतीही गोष्ट लोकांपासून लपून राहत नाही. आता स्मृतीच्या बाबतीत देखील असच घडलं आहे. स्मृती आपला बॉयफ्रेंड पलाश मुच्छाल (Palash Muchhal) सोबत लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पलाश मुच्छाल हा बॉलीवूड गायक पलक मुच्छाल याचा भाऊ आहे. बीसीसीआय (BCCI) कडून स्मृतीला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. स्मृतीला हा पुरस्कार मिळाल्यानंतर, इंस्टाग्रामवर पलाश मुच्छाल याने शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून या दोघांच्या चर्चा रंगल्या आहेत. या दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती आणि पलाश फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू असून, या दोघांचा विवाह शाही पद्धतीने केला जाणार असल्याची माहिती आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असले तरी अधिकृतरित्या दोघांकडूनही आपल्या नात्याविषयी खुलासा करण्यात आला नाही. मात्र आता थेट दोघे फेब्रुवारीमध्ये लग्नच करणार आहेत. स्मृतीच्या चाहत्यांना नवीन वर्षात गुड न्यूज मिळाली आहे.

हे देखील वाचा  Right age to get married: लग्न करणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींना लग्नाचे हे योग्य वय माहीत असायलाच हवे, अन्यथा..

IND vs ENG 1St test: ओली पोपच्या वादळात भारत उध्वस्त; त्या कारणामुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर..

NMMC Recruitment 2024: या उमेदवारांसाठी 110 जागांची भरती; जाणून घ्या डिटेल्स आणि असा करा अर्ज..

Mumbai Customs Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; 63 हजार पगार, वाचा सविस्तर..

Abdul Kalam on success Mantra: डॉ.अब्दुल कलाम यांचे चार गुरूमंत्र पाळा; अन्यथा संघर्ष, मेहनत करूनही मिळणार नाही यश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.