Rohit Sharma on retirement: सकाळी उठल्यावर माझ्या मनात..”; निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं धडकी भरवणारं उत्तर..

0

Rohit Sharma on retirement: भारत आणि इंग्लंड (India vs England test series) यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय फिरकीपटूंनी पाहुण्या संघाला मापक धावसंख्येवर रोखल्यानंतर, फलंदाजांनी आश्वासन फलंदाजी केली. काल पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, रोहित शर्माने दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) मुलाखत दिली. या मुलाखतीत रोहित शर्माने (Rohit Sharma) अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र निवृत्तीवर केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दिनेश कार्तिकने घेतलेल्या मुलाखतीत रोहित शर्माने अनेक विषयांवर भाष्य केले. माझ्यासाठी कोणताही रेकॉर्ड महत्त्वाचा नाही. मला आयसीसी ट्रॉफी (ICC trophy) हवी आहे. 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2019) मी पाच शतके केली होती. त्याचा काय उपयोग झाला? शेवटी आम्ही हरलोच. कोणी किती शतके केली, कोणी किती विकेट्स घेतल्या, याला मी फारसं महत्व देत नाही. माझ्या दृष्टीने ट्रॉफी म्हत्वाची आहे.

दिनेश कार्तिकने रोहित शर्माला निवृत्ती बाबत देखील प्रश्न विचारला. विवृतीवर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, अलीकडे माझा खेळ सुधारला आहे. मी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करण्यात मी यशस्वी झालो आहे. निवृत्ती विषयी सांगायचे झाल्यास मी एकच गोष्ट सांगेन, ज्या दिवशी मला सकाळी उठल्यानंतर वाटेल की आता मी खेळू शकणार नाही, त्याच दिवशी मी स्वतःहून निवृत्ती जाहीर करेल.

आगामी t20 विश्वचषक संघाचे नेतृत्व देखील रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. यावर्षी होणाऱ्या t20 विश्वचषकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार असेल, असं बोललं जात होतं. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे (Virat kohli) t20 मध्ये कमबॅक झाल्याने, या सगळ्या शक्यतांवर पडदा पडला आहे. हार्दिक पांड्याची दुखापत हा देखील मोठा फॅक्टर आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्याची भारतीय टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी हुकली, असंही बोललं जातं. त्यामुळे पुन्हा एकदा t20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. रोहित शर्माने देखील आगामी t20 विश्वचषक जिंकण्याचं आमचं लक्ष असल्याचं म्हंटल आहे.

सकाळी उठल्यानंतर जेव्हा मला आता मी खेळू शकणार नाही, असं वाटेल तेव्हा मी निवृत्ती जाहीर करेल. रोहित शर्माने असं विधान केलं असलं तरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची इच्छा देखील बोलून दाखवली आहे. त्यामुळे 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा देखील रोहित शर्मा भाग होणार असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचा

Rohit Sharma on Rahane Pujara: रहाणे पुजाराचे टेस्ट करिअर संपुष्टात आले का? रोहित शर्माच्या उत्तराने खळबळ..

Love tips: समोरून लाईन मिळते आहे, की नाही हे कसं ओळखाल? हे इशारे मिळत असतील, तर वेळ न घालवता बिंदास करा प्रपोज..

WPL 2024: आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक..

Love fact: ..म्हणून मुली करत नाहीत स्वतःहून प्रपोज; प्रपोज केल्यानंतर मुलींना काय वाटतं?

Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी सानिया मिर्झा करणार लग्न; त्या प्रस्तावामुळे भांडाफोड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.