UPI New rules: आता एका दिवसात करता येणार पाच लाखाचे व्यवहार आणि बरच काही; जाणून घ्या डिटेल्स..

0

UPI New rules: UPI आता सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनलं आहे. पूर्वी शॉपिंग आणि व्यवहार करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. अनेक सुट्ट्या पैशांची कमतरता भासत होती. एखादी छोटी वस्तू खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे जेमतेम तितकेच सुट्टे पैसे असायला हवे होते. त्यामुळे अनेकदा तुम्हाला तुमच्या आवडणाऱ्या वस्तू खरेदी करताना मोठी कसरत करावी लागत होती. आता मात्र तुम्ही एक लाख एक रुपयापासून लाखों रुपयांची शॉपिंग कॅशलेस (cashless) स्वरूपात सहजरीत्या करू शकता.

AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

अगदी तुमच्या मित्राने, नातेवाईकांनी शॉपिंग केलेले बिल देखील तुम्ही देशातल्या कोणत्याही भागावरून पे करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने NPCI एक जानेवारीपासून यूपीआय वापरकर्त्यांसाठी पाच नव्या योजना लागू केल्या आहेत. ज्याचा मोठ्या प्रमाणात फायदा यूपीआय वापरकर्त्यांना होणार आहे. जाणून घेऊया सविस्तर..

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन यूपीआय वापरकर्त्यांसाठी ज्या पाच महत्त्वाच्या सुविधा लागू केल्या, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, आता यूपीआय वापरकर्त्यांसाठी एक लाखाची मर्यादा पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. पूर्वी UPI वापरकर्त्यांसाठी एका दिवसात केवळ एक लाख रुपयाचा व्यवहार करता येत होता. आता मात्र तुम्हाला पाच लाखांपर्यंत व्यवहार करता येणार आहे. मात्र ही सुविधा केवळ शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय संस्थांनाच देण्यात आली आहे. इतरांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

पाच लाखांबरोबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने युपीआय वापरकर्त्यांसाठी आणखी एक भन्नाट सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा पैसे ट्रान्सफर करताना घाई गडबडीमध्ये अनोळखी व्यक्तींना पैसे ट्रान्सफर करण्याच्या घटना घडत होत्या. याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. आता मात्र यापासून मुक्तता मिळवण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन तोडगा काढला आहे.

जर तुम्ही एखाद्या नंबरला पहिल्यांदाच पेमेंट करत असाल, आणि ट्रान्सफर करण्याची रक्कम 2000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तुमचे पेमेंट चार तासानंतर पूर्ण होणार आहे. या चार तासांच्या कालावधीमध्ये तुम्ही रक्कम बदलू देखील करू शकता. इतकचं नाही, तर पेमेंट रोखण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.

याशिवाय तुम्हाला पंधरा हजारापासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देखील देण्यात येत आहे. कर्ज मिळवण्याची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी यावर क्लिक करा..कर्ज मिळवण्याची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी यावर क्लिक करा.. 

हे देखील वाचा cumin side effects: तुम्हीही सतत भाजीत जिरे टाकता? थांबा, जाणून घ्या जिऱ्याच्या सेवनाचा आरोग्यावर होणारा परिणाम..

GPay Loan: पैसे नसले तरी आता करता येणार व्यवहार; या स्टेप फॉलो करा अन् Google Pay कडून घ्या उसने पैसे..

Chanakya on money: चाणक्यांची ही गोष्ट पाळा खिसा कायम राहील गरम; अन्यथा आयुष्यभर कराल वणवण..

AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.