Second hand bike: Honda CB Unicorn 30, तर Hero splendor plus मिळतेय 22 हजारात; या ठिकाणी सुरू आहे, दमदार ऑफर..

0

Second hand bike: गेल्या काही वर्षात टू-व्हीलरच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. टू-व्हीलरच्या (two wheeler) किंमती बरोबर महागाई, बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 45 वर्षातील सगळ्यात मोठया बेरोजगारीची नोंद झाली आहे. इंधनाचे दर देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने, अनेकांना टू-व्हीलरवर प्रवास करणे परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अनेक जण सार्वजनिक वाहनांचा वापर करताना दिसून येतात. अशा परिस्थितीत बाजारात खूप कमी किंमतीत सेकंड हॅन्ड टू-व्हीलर गाड्यांची विक्री केली जात आहे.

जर तुम्ही देखील जुनी टू-व्हीलर गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अलीकडे बाजारामध्ये अनेक दर्जेदार सेकंड हॅन्ड बाईक विक्रीसाठी काढल्या जात आहेत. अनेक जण सेकंड हॅन्ड बाईकच्या शोधात देखील असतात. मात्र कामाच्या व्यापामुळे अनेकांना सेकंड हॅन्ड बाईकच्या ऑफर विषयी माहिती मिळत नाही. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी सेकंड हॅन्ड बाईक विषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.

हिरो आणि होंडा या दोन ऑटोमोबाईल कंपन्यांनी अनेकांच्या मनात घर केले आहे. अनेकजण या दोन कंपन्यांच्या गाड्या खरेदी करताना प्रामुख्याने दिसून येतात. जर तुम्हीही हिरो स्प्लेंडर आणि होंडा सीबी युनिकॉर्न ही गाडी खरेदी करू इच्छित असाल, तर ही गाडी केवळ तीस आणि वीस हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. Olx या वेबसाईटवर सेकंड हॅन्ड गाड्यांची ऑफरमध्ये विक्री करण्यात येत आहे.

ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीचे कंडीशन दमदार आहे. विक्रीसाठी मांडण्यात आलेली Hero splender Plus ही गाडी 2017 मधील आहे. ही गाडी केवळ तीस हजार किलोमीटर पळालेली आहे. ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या गाडीचे पासिंग पुण्याचे असून, या गाडीचा रंग निळा आणि काळा या कॉम्बिनेशनमध्ये आहे

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हिरो स्प्लेंडर ही सेकंड हॅन्ड गाडी तुम्ही फायनान्सच्या माध्यमातून सुलभ हप्त्यांसह देखील खरेदी करू शकता. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या गाडीच्या मालकाचा नंबर देखील याठिकाणी देण्यात आला आहे. प्रत्यक्ष मालकाशी संपर्क करून, तुम्ही गाडीची कंडीशन चेक करू शकता. यामुळे गाडीचे इंजिन, कंडीशन आवडल्या नंतरच तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

ओएलएक्स या वेबसाईटवर होंडा सीबी युनिकॉर्न ही टू-व्हीलर देखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. या गाडीची किंमत तीस हजार रुपये ठेवण्यात आली असून, ही गाडी देखील तुम्हाला फायनान्सच्या सुविधेसह खरेदी करण्याची संधी आहे. ही गाडी केवळ पन्नास हजार किलोमीटर पळाली आहे. त्यामुळे ही गाडी देखील दमदार कंडिशनमध्ये आहे. या गाडीचे आरटीओ पासिंग देखील पुण्याचे आहे.

ह देखील वाचा Ajit pawar vs Amol kolhe: ..म्हणून अजित पवारांना फुल कॉन्फिडन्स; काय आहे शिरूर लोकसभेचे गणित? खरचं कोल्हे पडतील?

SA vs IND 1St test: कसोटी पराभवाला रोहित शर्मा जबाबदार; सामन्यात रोहीत शर्मा कुठे होता..

IND vs SA 1St test: रोहित शर्माच्या त्या गाढव चुकीमुळे भारत पहिल्या कसोटीत पराभवाच्या छायेत..

Virat Kohli South Africa tour: त्या कारणासाठी विराट मालिका सोडून परतला भारतात; असा असेल आफ्रिकेविरूद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..

WTC Point table: जिंकणं सोडा, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ WTC final पर्यंतही पोचू शकत नाही..

PM Kisan 16th Installment: सोळाव्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर; तरच मिळणार 16 वा हप्ता, जाणून अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.