Anushka Sharma pregnancy: या महिन्यात होणार ज्युनिअर विराटचं आगमन; अनुष्काने व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती..

0

Anushka Sharma pregnancy: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रेग्नेंट असून, गेल्या अनेक दिवसांपासून याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. वर्ल्ड कपमध्ये अनुष्का शर्मा अनेक सामन्यांमध्ये उपस्थित राहिली होती. यामध्ये तिला बेबीबंप असल्याचं देखील पाहिला मिळालं होतं. आता अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ज्यामध्ये ती याविषयी बोलताना दिसत आहे. (Anushka Sharma viral video)

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat kohli and Anushka Sharma) हे प्रचंड आनंदी आणि अनेकांसाठी प्रेरणादायी कपल आहे. दोघे एकमेकांना मोठ्या आत्मीयतेने सपोर्ट करताना पाहायला मिळतात. विराट कोहली खराब फॉर्म मधून जात असताना अनुष्का शर्माने त्याच्या खंबीरपणे पाठीमागे उभे राहण्याचं काम केलं. विराट कोहली याविषयी बोलताना मोठ्या अभिमानाने आपल्या पत्नीचे कौतुक करताना पाहायला मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी अनुष्का शर्माला हॉस्पिटल बाहेर देखील स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का शर्मा सध्या प्रेग्नेंट आहे. हे स्पष्ट झालं असलं तरी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांकडूनही प्रेग्नेंसी विषयी खुलासा करण्यात आला नाही. मात्र या संदर्भात अनुष्का शर्माने एक पेड व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याच्या माध्यमातून अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

विराट आणि अनुष्का शर्माने 11 डिसेंबर 2017 मध्ये विवाह केला. काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनीही इटलीमध्ये लग्न गाठ बांधली. या दोघांनी 2021 मध्ये एका मुलीला जन्म दिला. दोघांच्या नावावरून आपल्या मुलीचे नाव त्यांनी वामीका असं ठेवलं आहे. अनुष्का शर्मा सध्या तीन महिन्याची गरोदर आहे. अनुष्का शर्मा जूनमध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देऊ शकते, अशी माहिती आहे.

अनुष्का शर्माने प्रेग्नेंसी संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओखाली विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी गोड शुभेच्छा देखील दिल्या आहेत. खूप खूप अभिनंदन.. ज्युनियर विराटसाठी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.. आम्ही ज्युनियर विराटची वाट पाहतोय. अशा प्रकारच्या सुंदर कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

हे देखील वाचा Mumbai Indians: IPL Auction मध्ये कमाल केल्याने, मुंबई विजेतेपदाची दावेदार; रोहितच्या जाण्यानेही नाही पडणार फरक, पाहा संघ..

Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..

Chanakya Niti On Money: चाणक्यांच्या या चार गोष्टी माहिती नसतील, तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊच शकत नाही..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

Rohit Sharma vs MI: हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सला BCCI ची चपराक; रोहित शर्मावर घेतला हा मोठा निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.