Chanakya Niti On Money: चाणक्यांच्या या चार गोष्टी माहिती नसतील, तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊच शकत नाही..

0

Chanakya Niti On Money: पैसा (money) सर्वस्व नाही, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आपण अनेकदा बोलून देखील दाखवतो. मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे. जीवनात पुरेसा पैसा नसेल, तर तुम्हाला जीवन जगताना अनेक अडचणी येतात. पैशाच्या गरजेपुढे अनेकदा स्वाभिमान घाण ठेवावा लागतो. जर तुमच्याकडे पैसा नसेल, तर समाज तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, फारसे महत्व देत नाही. अनेकांना यासंबंधी अनुभव देखील आले असतील. मात्र या सगळ्या अडचणींना तुम्ही स्वतःच जबाबदार असता.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (chanakya niti) या ग्रंथातून त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. जीवनात पैशाचे महत्व देखील आचार्य चाणक्यांनी पटवून दिले आहे. मुबलक पैसा कमवण्यासाठी अनेक जण धडपड करतात. मात्र कष्ट करण्याची पद्धत योग्य नसल्याने, माणसाच्या हातात पैसा येत नाही. आणि राहतही नाही. असं चाणक्य सांगतात. तुमच्याकडेही पैशाची कमतरता भासू नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेले मार्ग अवलंबने आवश्यक आहे.

आचार्य चाणक्य सांगतात, पैशाचे नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. साठवून ठेवलेली कोणतीही गोष्ट ज्या पद्धतीने खराब होती, पैशाच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो. श्रीमंत होण्याचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पैशाची बचत. मात्र बचत करत असलेला पैसा योग्य मार्गाने लावणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. असे चाणक्य सांगतात. तुम्ही बचत करत असलेल्या पैशातून तुम्हाला उत्पन्न मिळते की नाही, हे नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे चाणक्य सांगतात.

चाणक्य सांगतात, पैसे कमावण्यासाठी सकारात्मकता फार आवश्यक आहे. तुम्ही नेहमी सकारात्मक ऊर्जेत राहाल, अशाच ठिकाणी पैशाची गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचं चाणक्य सांगतात.

चाणक्य सांगतात, प्रत्येकाच्या जीवनात येणारा काळ कायम तसाच राहत नसतो. त्यामुळे तुम्ही जमिनीशी जोडून राहणं आवश्यक आहे. नेहमी नम्रता आणि साधेपणा तुमच्यामध्ये असणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला वास्तवाची जाणीव होत राहील. आणि म्हणून, या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, जीवनामध्ये प्रचंड श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही पैशाचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी पैसे जपून ठेवणे हा मूर्खपणा असल्याचं चाणक्य सांगतात. पाणी ज्याप्रमाणे अधिक काळ साठवून राहिल्यानंतर, त्याला त्याची दुर्गंधी येते. त्याचप्रमाणे पैशाची केवळ साठवणूक करून तुमच्यामध्ये नकारात्मक येते. असे चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Mumbai Indians: IPL Auction मध्ये कमाल केल्याने, मुंबई विजेतेपदाची दावेदार; रोहितच्या जाण्यानेही नाही पडणार फरक, पाहा संघ..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

Pat Cummins Travis Head: रचिन रवींद्र, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल, पॅट कमिन्सची रेकॉर्ड ब्रेक खरेदी; पाहा कोण कुठे गेलं..

IPL 2024 captain: मुंबईसह चार संघाच्या कर्णधार पदामध्ये मोठा उलटफेर; जाणून घ्या दहाही संघाचे कर्णधार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.