Viral video: पाणी म्हणून चित्ता प्यायला भट्टीतली दारू; चीत्यासोबत गावकऱ्यांनी केले अमानुष कृत्य, पाहा व्हिडिओ..

0

Viral video: सोशल मीडियावर (social media) कधी काय पाहायला मिळेल, हे काही सांगता येत नाही. चित्ता (leopard) हा किती हिंस्र प्राणी आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. चित्याने वस्तीत घुसून अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना तुम्ही सोशल मीडियावर (social media) अनेकदा पाहिल्या असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला विश्वासही बसणार नाही. (Leopard Viral video)

दारू माणसावर किती नियंत्रण मिळवते, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. मात्र प्राण्यांवरही नियंत्रण मिळवू शकते, हे तुम्ही फार क्वचित पाहिले असेल. चित्ता म्हणजे प्रचंड हिंस्र प्राणी ज्याच्याजवळ चुकूनही कोणी जायचं धाडस करणार नाही. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यामध्ये चीत्यांची गावकऱ्यांनी धिंड काढली आहे. होय तुम्ही बरोबरच वाचलं आहे.

ट्विटरवर @manojpehul या नावाच्या ट्विटर हॅण्डलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये चित्त्याने कच्च्या भट्टीत जाऊन दारू पिल्याने, तो स्वतःला विसरून गेला असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत चित्ता चालताना स्वतःचा तोलही सांभाळू शकत नसल्याचे दिसत आहे. पाठीमागे गावकरी त्याची मजा घेत त्याला जंगलाची वाट दाखवताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड मजेशीर असून, चित्ता स्वतः आपण चित्ता असल्याचे विसरून गेला आहे. दारूने त्याच्यावर कमालीचा ताबा मिळवल्याचे दिसत आहे. तो आपण कोण आहे? आपली वाट कुठे आहे? आणि माणसांचा भलामोठा घोळखा आपला पाठलाग करत आहे. आपल्याला पकडुन वाट दाखवत आहे. याची काहीही कल्पना त्याला नसल्याचं दिसत आहे.

ट्विटरवर @manojpehul या नावाच्या ट्विटर हॅण्डलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तीन तारखेला हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. केवळ दोन दिवसात या व्हिडिओला पाच लाखाहून अधिक views मिळाले आहेत. व्हिडिओ खाली अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. शराब का चक्कर बाबुभाई अशा प्रकारच्या मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ राजस्थान मधील तारागढ़ गावातला असल्याचं सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा India Squad For ODI World Cup 2023: या तीन खेळाडूंना मिळाला डच्चू; असा आहे वर्ल्ड कपसाठी भारताचा पंधरा सदस्यीय संघ..

PAK vs IND: या दिवशी पुन्हा रंगणार भारत पाकिस्तान थरार; पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल परतणार, या खेळाडूचा जाणार बळी..

Acharya Chanakya Niti: ..म्हणून सुंदर मुलीशी चुकूनही लग्न करू नका; चाणक्यांनी सांगितलेल्या त्या तीन गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या..

NABARD Assistant Manager Recruitment 2023: या उमेदवारांना NABARD मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; तब्बल इतक्या जागा, पाहा पात्रता आणि निकष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.