Acharya Chanakya Niti: ..म्हणून सुंदर मुलीशी चुकूनही लग्न करू नका; चाणक्यांनी सांगितलेल्या त्या तीन गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या..

0

Acharya Chanakya Niti: लग्न (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्याची नवी सुरवात होते. लग्न जमवताना तुमच्यापैकी बरीचशी मंडळी मुलीचं सौंदर्य पाहून मुलगी पसंत करतात. मात्र केवळ सौंदर्य पाहून तुम्ही मुलगी पसंत करत असाल, तर तुम्ही आयुष्यात येणाऱ्या अडचणींना आमंत्रण देताय असं चाणक्य म्हणतात.

आचार्य चाणक्य हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथामधून त्यांनी अनेक विषयांत हात घातला आहे. यामध्ये व्यवसाय, नातेसंबंध, महिलांच्या चारित्र्यावर देखील आचार्य चाणक्यांनी भाष्य केले आहे. लग्न जमवताना मुलाने काय काळजी घ्यावी? याविषयी देखील आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथात सविस्तर भाष्य केले आहे.

आचार्य चाणक्य सांगतात, कोणतंही नातं नीतिमत्ता, विश्वास आणि बौद्धिक क्षमतेवर टिकून असतं. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये देखील या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. लग्न जमवताना अनेक जण केवळ सौंदर्य पाहूनच मुलगी पसंत करतात. मात्र एक सुंदर मुलगी बौद्धिक क्षमतेने परिपूर्ण असेलच असे नाही.

आचार्य चाणक्य म्हणतात, सौंदर्य हे चिरकाल टिकत नाही. मात्र भौतिक क्षमता माणसाच्या कायम सोबत राहते. म्हणून लग्न जमवताना मुलाने नेहमी मुलींच्या सौदर्यपेक्षा स्वभाव कसा आहे? हे पाहणं आवश्यक असतं. मुलगी जर संयमी, चारित्र्यवान, सहनशील या गोष्टींचा विचार करूनच लग्नाला होणार द्यावा असं चाणक्य सांगतात.

वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि आनंद चिरकाल ठेवायचं असेल, तर मुलीच्या सौंदर्यापेक्षा तिची बौद्धिक क्षमता उजाळायला हवी. असं चाणक्य सांगतात. मुलगी केवळ सुंदर असेल, आणि तिच्याकडे संयम सहनशीलता बौद्धिक क्षमता या गोष्टी नसतील तर घरात सतत वाद होतात. तुमच्या संघर्षाच्या काळात ती साथ देईलच हे ठामपणे सांगता येत नाही. याशिवाय घरातल्या सदस्यांसोबत देखील ती एकरूप होत नाही. असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचाPAK vs IND: या दिवशी पुन्हा रंगणार भारत पाकिस्तान थरार; पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल परतणार, या खेळाडूचा जाणार बळी.. 

NABARD Assistant Manager Recruitment 2023: या उमेदवारांना NABARD मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; तब्बल इतक्या जागा, पाहा पात्रता आणि निकष..

Acharya Chanakya: त्या कारणामुळे बायका लवकर दिसतात म्हाताऱ्या; वयाचा आणि त्या गोष्टीचा आहे थेट संबंध..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.