PAK vs IND: या दिवशी पुन्हा रंगणार भारत पाकिस्तान थरार; पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल परतणार, या खेळाडूचा जाणार बळी..
PAK vs IND: आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धा आता रंगतदार अवस्थेत आली आहे. ग्रुपA मधील दोन संघ सुपर फोरमध्ये पोहोचले आहेत. मात्र ग्रुपB मधील एकही संघ अद्याप सुपर फोर4 मध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करू नाही. मात्र श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ सुपर4 मध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे. पावसामुळे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामधील 2 सप्टेंबरला खेलवण्यात आलेला सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेता आला नाही.
मात्र आता पुन्हा एकदा भारतीय संघाला पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे भारतीय संघाला पराभूत करत आशिया चषक स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाला सुपर4 मिळणार आहे.
दुखापतीच्या कारणामुळे केएल राहुल (kl Rahul) पहिले दोन सामने खेळू शकला नाही. मात्र सुपर4 मधील सामन्यात केएल राहुलचं भारतीय संघात कमबॅक होणार आहे. केएल राहुल थेट भारतीय संघाच्या अंतिम 11 मध्ये प्रवेश करणार असल्याने, टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मा (rohit sharma) समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जर केल राहुलला भारताच्या अंतिम11 मध्ये समाविष्ट करायचे झाल्यास, ईशान किशनचा बळी जाणार आहे.
ईशान किशनने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केले होते. भारतीय टॉप ऑर्डर कोलमडल्यानंतर, हार्दिक पांड्यासोबत ईशान किशनने डावाची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. आणि भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. एकवेळ भारताची स्थिती 4 बाद 66 अशी झाली होती. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून ईशान किशनने 81चेंडूत 82 धावांची खेळी केली.
गेल्या काही सामन्यातून ईशान किशन दमदार खेळायचं प्रदर्शन करत आहे. वेस्टइंडीजमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत ईशानने दमदार खेळ केला. आव्हानात्मक खेळपट्टीवर इतर फलंदाज अपयशी होत असताना, चांगल्या गतीने त्याने धावा केल्या. परंतु त्यावेळी ईशान किशन सलामीवीर म्हणून खेळत होता. मधल्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो अपयशी ठरला होता. यावेळी मात्र टीम संकटात असतानाही त्याने प्रेशर हॅण्डल करत चांगल्या स्ट्राइक रेटने 82 धावांची खेळी केली.
ईशान किशनने केलेल्या दमदार खेळामुळे त्याला आता मधल्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी आणखी द्यायला हवी. असं अनेकांनी म्हटलं आहे. एखादा खेळाडू दमदार फॉर्ममध्ये असेल, तर त्याला ड्रॉप करणे संघाच्या हिताचं ठरत नाही.
मात्र चांगला खेळ करून देखील ईशान किशनला केएल राहुल संघात परतल्यानंतर, बाहेर बसावं लागणार आहे. भारतीय संघाचा पुढील सामना पाकिस्तान बरोबर 10 सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार आहे. या सामन्यावर देखील पावसाचे सावट असल्याने, क्रिकेट चाहत्यांची निराशा होऊ शकते.
हे देखील वाचा IOCL Recruitment 2023: या उमेदवारांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम