IOCL Recruitment 2023: या उमेदवारांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स..

0

IOCL Recruitment 2023: बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असली तरी अनेक विभागांमध्ये नोकरीची संधी देखील निर्माण होत आहे. इंडियन ऑईल (Indian oil corporation limited) भरती निघाली असून, यासंदर्भातली अधीसूचना जारी करण्यात आली आहे. इंडियन ऑइल अंतर्गत एकूण 490 रिक्त पदांची भरती केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 10 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे.

इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) विविध विभागासाठी केल्या जाणाऱ्या पदांची वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. सर्वप्रथम आपण या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय आहे? हे जाणून घेऊ..

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 490 रिक्त जागा “अप्रेंटीस” या पदासाठी भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करायची आहे, अशा उमेदवारांना 10 सप्टेंबर पर्यंत अर्ज करायचे आहेत.

देशातला कोणताही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना तेलंगणा, कर्नाटक तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नोकरी करावी लागणार आहे.

वयोमर्यादा आणि पदांचा तपशील

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय 19 आणि किमान वय 24 असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार, प्रवर्गातील अर्जदार उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. पदांच्या तपशील विषयी अधिक सांगायचे झाल्यास, टेक्निशियन, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, ट्रेड अप्रेंटिस, या विभागामध्ये एकूण 490 रिक्त जागा भरायच्या आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज

प्रत्येक पदांनुसार उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रामध्ये उमेदवारांना दोन वर्षाचा आयटीआय त्याचबरोबर इतर काही पदांकरिता उमेदवाराचा इंजिनियरिंग डिप्लोमा देखील असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन http://www.iocl.com असं सर्च करायचं आहे. त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला Apprentice या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यांनतर Apply Online हा पर्याय पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म व्यवस्थित वाचून भरा. आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. शुल्क भरल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट करा.

हे देखील वाचा Asia Cup 2023 IND vs PAK: ..म्हणून आशिया चषकात हे तीन खेळाडू अपयशी ठरले तर वर्ल्ड कपचा पत्ता होणार कट; BCCI चा प्लॅन तयार..

successful Life tips: यश तर मिळणार नाहीच, पण या चार गोष्टींना चुकूनही शिवलात तरी जीवनातून उठाल..

Asia Cup 2023 1St match: वर्ल्ड कप सोडा, या चार चुकामुळे भारत आशिया कपही जिंकू शकणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.