Asia Cup 2023 IND vs PAK: ..म्हणून आशिया चषकात हे तीन खेळाडू अपयशी ठरले तर वर्ल्ड कपचा पत्ता होणार कट; BCCI चा प्लॅन तयार..

0

Asia Cup 2023 IND vs PAK: भारतात होणाऱ्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र असं असलं तरी भारतीय संघापुढे अनेक आव्हाने देखील आहेत. विश्वचषकाचा पहिला पेपर म्हणून, आशिया चषक स्पर्धेकडे पाहिले जात आहे. भारतीय संघाच्या काय उणीवा आहेत, हे या स्पर्धेत समजणार आहे. याशिवाय काही खेळाडूंच्या कामगिरीवर देखील BCCI चे लक्ष असून, जर हे खेळाडू या स्पर्धेत अपयशी ठरले तर मात्र या खेळाडूचा पत्ता देखील कट होणार असल्याचं सांगण्यात येत आहेत.

आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारत पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षापासून आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान भारतीय संघाला उजवा ठरला आहे. अशातच आता भारतीय फलंदाजीचे क्रमांक सेट झालेले नसल्याने पाकिस्तान संघ अधिक तुल्यबळ वाटत आहे.

अनेक महिन्यांनंतर, केएल राहूल (kl Rahul) आणि श्रेयस अय्यरचे (shreyas Iyer) भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्याने, पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना तो खेळणार नसल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. विश्वचषकाच्या (world Cup 2023) दृष्टीने आशिया चषक (asia Cup 2023) स्पर्धा ही खूप महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विशेष करून केएल राहुल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, तिलक वर्मा (Tilak Varma) सूर्यकुमार यादव (SuryaKumar yadav) हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे बीसीसीआयचे (BCCI) लक्ष असणार आहे.

आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, या खेळाडूंच्या कामगिरीकडे टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआयचे लक्ष असणार आहे. श्रेयस अय्यर, केएल राहुल हे दोघेही अपयशी ठरले तर यांच्या जागी सूर्यकुमार यादव तिलक वर्मा आणि संजू सॅमसनची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे.

मात्र हे चारही फलंदाज अपयशी ठरले, तर मात्र टीम मॅनेजमेंट केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनाच विश्वचषकच्या संघात संधी देणार असल्याची देखील माहिती आहे. याशिवाय अक्षर पटेलच्या जागेवर युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) संघात निवड होऊ शकते. मात्र अक्षर पटेलने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले तर मात्र हा प्रश्न उद्भवणार नाही.

सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि युझवेंद्र चहल यांना भारताच्या विश्वचषक संघात कशी संधी देता येईल, याचा विचार टीम मॅनेजमेंट करत आहे. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि केएल राहुल आशिया चषक स्पर्धेत अपयशी ठरले तर, या तिघांची विश्वचषक संघातून हकलपट्टी होईल. या तिघांच्या जागेवर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन यापैकी तिघांचा संघात समावेश केला जाईल.

हे देखील वाचा Asia Cup 2023 1St match: वर्ल्ड कप सोडा, या चार चुकामुळे भारत आशिया कपही जिंकू शकणार नाही..

Asia Cup 2023 squad: ..म्हणून भाजपच्या खासदाराने मोहम्मद शमीच्या निवडीवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाला त्याच्या जागी..

Asia Cup 2023 India squad: ..म्हणून चहलची निवड केली नाही; अजित आगरकरच्या उत्तराने दिग्गजांचा संताप..

face beauty tips: तुम्हीही रात्री चेहरा न धुता झोपता? जाणून घ्या चेहरा धुवून झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.