face beauty tips: तुम्हीही रात्री चेहरा न धुता झोपता? जाणून घ्या चेहरा धुवून झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे..

0

face beauty tips: धावपळीमुळे अलीकडे आरोग्य आणि सौंदर्याकडे (health and beauty) फारसं लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आपण पाहतो, कुठेही बाहेर फिरायला जायचं असेल बऱ्याचदा महिला मेकअप करतात. अगदी पुरुष देखील यात पाठीमागे नाहीत. परंतु आपल्यापैकी संध्याकाळी घरी आल्यानंतर, अनेक जण हात पाय तोंड न धुताच झोपी जातात. कामावरून घरी आल्यानंतर, आपल्याकडे फ्रेश होण्याची पद्धत आहे, अनेकजण अंघोळही करतात. (Face beauty tips)

असंख्य जण असे देखील आहेत, जे रात्री तोंड न धुताच झोपी जातात. मात्र तुमची ही सवय तुमच्या सौंदर्यामध्ये मोठी अडचण ठरू शकते. एवढेच नाही, तर स्कीनची एलर्जी देखील होण्याची दाट शक्यता आहे. चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवायची असेल, तर तुम्हाला झोपण्यापूर्वी नियमितपणे चेहरा स्वच्छ धुवून घेणे फार आवश्यक आहे. जाणून घेऊया झोपण्यापूर्वी चेहरा नियमित धुण्याचे फायदे..

कामामुळे दिवसभराच्या कामामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात घाम येत असतो. बाहेर असणाऱ्या मुळेप्रदूष मातीमुळे आपल्या चेहऱ्याची छिद्रे देखील बंद पडत असतात. घामामुळे चेहरा आणि शरीरावर ऑइल सारखा पदार्थ देखील जमा होतो. यामुळे देखील लहान छिद्रे बंद होत असतात. साहजिकच या गोष्टीमुळे त्वचेची समस्या उद्भवते. आणि म्हणून रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून झोपणे आवश्यक आहे.

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नियमितपणे धुतल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. तोंड आणि नाकाप्रमाने चेहऱ्यावर असणारी लहान छिद्रे देखील श्वास घेत असतात. नियमितपणे चेहरा धुतल्याने चेहरा तरुण दिसू लागतो. रात्री चेहरा नियमितपणे धुतल्यास चेहऱ्याची चमक वाढते. मुरुमांची समस्या नाहीशी होऊन चेहरा फ्रेश दिसू लागतो.

जसं वय वाढू लागतं, तसं चेहऱ्याचे सौंदर्य देखील गायब होत जाते. चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात होते. चेहऱ्याचा ताजेपणा, आणि चेहऱ्यावरचा तरुणपणा कायम ठेवण्यासाठी चेहरा मॉइश्चरायज असणं फार आवश्यक असतं. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे चेहरा कोमट पाण्याने धुतल्यास चेहऱ्याची स्किन ड्राय होण्यापासून वाचते.

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने नियमितपणे दोन्ही सौंदर्यासाठी फार आवश्यक आहे. मात्र हे करत असताना तुम्ही चेहऱ्यावर रात्री कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट लावू नका. चेहरा धुण्याची योग्य पद्धत म्हणजे, रात्री चेहरा धुताना अजिबात जोर लावून चेहरा घासू नका. चेहरा धुतल्यानंतर, व्यवस्थित हलक्या हाताने पुसून घ्या. शक्य झाल्यास चेहऱ्याला हळद देखील नियमितपणे लावा. हळदीने चेहऱ्यावर असणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.

हे देखील वाचाAtal Pension Yojana: दर महिन्याला भरा फक्त 210 रुपये,आणि वर्षाला मिळावा 60 हजार; जाणून घ्या केंद्राची ही भन्नाट योजना.. 

Women nature Tips: महिलांच्या केसाच्या लांबीवरून ओळखता येतो स्वभाव; वाचा अधिक..

almond benefits: सद्गुरूंनी सांगितले दारूपेक्षाही जास्त यकृतताला घातक आहेत बदाम; बदाम खात असाल तर पाहिले हे वाचा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.