Atal Pension Yojana: दर महिन्याला भरा फक्त 210 रुपये,आणि वर्षाला मिळावा 60 हजार; जाणून घ्या केंद्राची ही भन्नाट योजना..

0

Atal Pension Yojana: प्रत्येकाला भविष्याची काळजीही असतेच. भविष्यात आर्थिक संकट येऊ नये, यासाठी अनेकजण बचत करत असतात. किंवा भविष्यासाठी तरतूद करून ठेवत असतात. सरकार देखील अशा लोकांसाठी पैसे गुंतवणूक करून घेऊन त्यांना चांगला परतावा देण्याचे काम करत आहे. जर तुमच्या इन्कम मधील रक्कम केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेमध्ये तुम्ही दरमहा जमा केल्यास, तुम्हाला चांगला परतावा मिळतो. जाणून घेऊया योजनेविषयी.. (Atal Pension Yojana)

केंद्र सरकारने (Central government) अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) 2015 साली सुरू केली. देशातल्या गरीब नागरिकांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दरमहा पाच हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच, वर्षाला तुम्हाला साठ हजार रुपये रक्कम केंद्र सरकार देते. यासाठी तुम्हाला केवळ 210 रुपये दरमहा रक्कम अटल पेन्शन योजनेत जमा करायची आहे.

योजनेचे स्वरूप 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा निश्चित करून दिली आहे. जर तुमचे वय 18 ते 40 या दरम्यान असेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. जर तुमचे वय 18 असेल, तर तुम्हाला वीस वर्ष 210 रुपये दरमहा जमा करायचे आहेत. त्यानंतर तुमचे वय 60 झाल्यानंतर, तुम्हाला केंद्र सरकार दरमहा 5000 रुपये पेन्शन देणार आहे. म्हणजेच दर वर्षी तुम्हाला 60 हजार रुपये मिळणार आहे.

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीलाही मिळणार पेन्शन

जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, आणि तुमचा साठ वर्षानंतर अकस्मित मृत्यू झाला, तर या योजनेच्या माध्यमातून तुमच्या पत्नीला पेन्शनचा लाभ दिला जातो. जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला तुम्ही भरलेली रक्कम परत घ्यायची असेल, तरीदेखील अटल पेन्शन योजनेत अशी तरतूद करण्यात आली आहे. जर पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाला, तरी देखील नॉमिनीला तुमची रक्कम देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आहे.

लाभाची पात्रता

जर तुम्ही अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 या दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, ओळखपत्र, रहिवाशी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, इत्यादी कागदपत्र तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.

कसा कराल अर्ज..?

अटल पेन्शन योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याच्या आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html असं सर्च करायचं आहे.

त्यांनतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर “नेशनल पेन्शन योजना” हा पर्याय पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यांनतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. जर तुम्हाला ही प्रक्रिया किचकट वाटत असेल, तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस विभागामध्ये देखील या योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकता.

हे देखील वाचा Women nature Tips: महिलांच्या केसाच्या लांबीवरून ओळखता येतो स्वभाव; वाचा अधिक..

India team for Asia Cup 2023: आज होणार आशिया, वर्ल्ड कप संघाची निवड; तिलकच्या निवडीला हिरवा कंदील, असा असेल भारतीय संघ..

Hardik Pandya: मालिका पराभवामुळे नाही, हार्दिकच्या त्या चार चुका आणि मूर्ख विधानामुळे T20 कर्णधारपद धोक्यात..

almond benefits: सद्गुरूंनी सांगितले दारूपेक्षाही जास्त यकृतताला घातक आहेत बदाम; बदाम खात असाल तर पाहिले हे वाचा..

Age for Marriage: या गोष्टी टाळण्यासाठी आणि नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी याच वयात लग्न करणं आवश्यक; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.