Hardik Pandya: मालिका पराभवामुळे नाही, हार्दिकच्या ‘त्या’ चार चुका आणि मूर्ख विधानामुळे T20 कर्णधारपद धोक्यात..

0

Hardik Pandya: वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या पाच T20 सामन्याच्या सिरीजमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. वेस्टइंडीज सारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाविरूद्ध भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपस्थित झालेल्या प्रश्नाची उत्तरे शोधण्या ऐवजी हार्दिक पांड्याने मालिका गमावल्यानंतर केलेल्या विधानामुळे आता हार्दिक पांड्याच्या टी-ट्वेंटी कर्णधार पदावर गदा आली आहे. (India vs West Indies T20 series)

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये इंग्लंड कडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. लगातार दोन्ही टी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी सामान्य राहिली. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाची तयारी म्हणून, नवीन संघ उभारायला सुरुवात झाली. रोहित शर्मा (rohit sharma) विराट कोहली (Virat kohli) केएल राहुल (kl Rahul) यासारख्या दिग्गज खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून वगळण्यात आले.

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळल्या गेलेल्या वेस्टइंडीज विरुद्धच्या पाच टी ट्वेन्टी सामन्यात हार्दिक पांड्याने असंख्य चुका केल्या. विशेष म्हणजे, मालिका गमावल्यानंतर हार्दिक पांड्याने पराभव गरजेचा असल्याचे विधान केल्याने, क्रिकेटच्या सर्व स्तरातून टीका होत आहे. हार्दिक पांड्याने या टी ट्वेंटी सिरीजमध्ये अनेक चुका केल्या.

दुसऱ्या T20 सामन्यात खेळताना वेस्टइंडीज संघाचे दोन फलंदाज लागोपाठ बात करत भारताने गमावलेल्या सामन्यावर चहलने भारतीय संघाला पकड मिळवून दिली. मात्र अठरावे षटक हार्दिक पांड्याने चहलला देण्याऐवजी अर्षदिप सिह, त्यानंतर मुकेश कुमारला दिले. आणि भारताने जिंकलेला सामना गमावला.

हार्दिक पांड्याने या मालिकेतील दुसरी चूक केली, ती म्हणजे मुकेश कुमारला सुरुवातीला गोलंदाजी दिली नाही. आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुकेश कुमारने वेस्टइंडीज संघाला सुरुवातीला धक्के देण्यात कदाचित यश मिळवलं असतं. आगामी विश्वचषकासाठी देखील भारतीय संघामध्ये समावेश करण्यासंदर्भात त्याच्याकडे पाहिले जात आहे. तो सुरुवातीला कशी गोलंदाजी करतो, हे पाहण्याची देखील संधी मिळाली असती.

चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय सलामी जोडीने, वेस्टइंडीज संघाने दिलेल्या 180 धावाचे आव्हान सहज पूर्ण केले होते. फलंदाजी धावांचा पाठलाग करणारी होती, तरीही हार्दिक पांड्याने पाचव्या आणि निर्णायक T 20 सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

दबाव असणाऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य असतो हे क्रिकेटचे बेसिक गणित आहे. हे मान्य आहे, पराभव होऊ शकतो, हे देखील मान्य आहे. मात्र मालिका पराभवानंतर, पराभव देखील गरजेचा असतो. हे विधान हार्दिक पांड्याने करणे कितपत योग्य होतं असा प्रश्न अनेक क्रिकेट दिगजांनी उपस्थित केला आहे.

मोठी टूर्नामेंट जिंकायची असेल, तर तुम्हाला क्रिकेटचा कोणताही सामना असो, तो निर्णायक सामना आहे. याच पद्धतीने खेळावं लागेल. हे वाक्य 2011 च्या विश्वचषकाची तयारी म्हणून, तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय संघाला सांगितलं होतं.

मालिका गमावल्यानंतर हार्दिक पांड्याने केलेले विधान बेजबाबदार आहे. याचा कोणताही फायदा भारतीय क्रिकेटला होणार नाही. हार्दिक पांड्याच्या विधानाची दखल बीसीसीआयने देखील घेतल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही, तर पुन्हा एकदा भारतीय टी ट्वेंटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे जाणार असल्याची देखील माहिती आहे.

हे देखील वाचा IND vs WI 5th T20: हे दोन खेळाडू आजच्या निर्णायक सामन्यात चमकले, तरच मिळणार विश्वचषक संघात थेट एन्ट्री..

ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..

Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.