IND vs WI 5th T20: हे दोन खेळाडू आजच्या निर्णायक सामन्यात चमकले, तरच मिळणार विश्वचषक संघात थेट एन्ट्री..

0

IND vs WI 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या पाच T 20 सामन्याच्या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा टी ट्वेंटी सामना आज लॉडरहिल, फ्लोरिडा (Lauderhill, Florida) मैदानावर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल. दोन्ही संघाकडे आजचा सामना जिंकून मालिका विजय साकारण्याची संधी असणार आहे. गेल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यापासून भारतीय संघाला लय सापडली असून, आता अखेरसाठी ट्वेंटी सामना जिंकून मालिका विजयाचा निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल. (India versus West Indies decider T20 match)

बायलॅटर सिरीजमध्ये निर्णायक सामन्यात भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. असं असलं तरी देखील नवीन संघ करो या मरो स्थितीत कशी कामगिरी करतो? याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने अनेक नवीन खेळाडूंना विश्वचषकात स्थान मिळवण्याची मोठी संधी वेस्टइंडीज दौऱ्याने दिली आहे. तिलक वर्मा (Tilak Varma) यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि मुकेश कुमार (mukesh kumar) या तीन खेळाडूंना भारतीय विश्वचषक संघात संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

पाचव्या आणि अखेरच्या T-20 सामन्यात तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोन प्रमुख फलंदाजाकडे निवड समिती आणि भारतीय टीम मॅनेजमेंटचे देखील लक्ष असेल. या दोन्ही फलंदाजांनी जर अखेरच्या t20 सामन्यात दमदार खेळ केला तर आगामी विश्वचषकासाठी या दोन्ही खेळाडूंना एकदिवसीय संघाच्या 15 सदस्यांमध्ये सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील लॉडरहिल, फ्लोरिडा (Lauderhill, Florida) ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने, आजच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना हाई स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. चौथ्या t20 सामन्यात वेस्टइंडीज संघाने टॉस जिंकून फलंदाजी केली. मात्र मोठी धावसंख्या उभारण्याच्या नादात वेस्टइंडीज संघाचे फलंदाज खराब फटके मारून बाद झाले. मात्र चौथ्या t20 सामन्यात अधिक जबाबदारीने फलंदाजी केली, तर वेस्टइंडीज संघाकडे देखील मालिका जिंकण्याची संधी असेल.

आजच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने सलग दुसऱ्यांदा दमदार खेळ सादर केला, तर विश्वचषकाच्या संघात त्याचा सहभाग केला जाण्याची शक्यता जवळजवळ स्पष्ट आहे. तिलक वर्माने देखील आव्हानात्मक खेळपट्टीवर आपला जलवा दाखवत, भारताच्या अनुभवी इतर फलंदाजाहून अधिक सरस कामगिरी केली. याशिवाय भारतीय संघात मधल्या फळीत एकही डावखुळा फलंदाज नसल्याने, आगामी विश्वचषक संघात त्याचा विचार केला जात आहे. साहजिक त्यामुळे आजचा सामना या दोन्ही खेळाडूंसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे.

असा असेल भारताचा अंतिम संघ…

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (क), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार

हे देखील वाचा WI vs IND 4th T20: एकच धमाकेदार खेळी, अन् यशस्वीची वर्ल्ड कप संघात एन्ट्री? अजित आगरकर सोबतचे घनिष्ट संबंध पथ्यावर..

Newly marriage Tips: नवीन लग्न झालेल्या पुरुषांनी अशा प्रकारे खा कांदा आणि मेथी एकत्र; त्यासाठी मिळतील हे अनगिनत फायदे..

ISRO Recruitment 2023: दहावी पास असाल तर लगेच या पद्धतीने करा अर्ज; ISRO मध्ये निघालीय मोठी भरती..

ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..

Soaked Peanuts Benefits: रोज मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा, त्या गोष्टी बरोबरच मिळतील आरोग्याचे अनेक फायदे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.