ISRO Recruitment 2023: दहावी पास असाल तर लगेच या पद्धतीने करा अर्ज; ISRO मध्ये निघालीय मोठी भरती..
ISRO Recruitment 2023: जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल, आणि नोकरी करू इच्छित असाल, तर ISRO मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. ISRO ने या संदर्भात अधिसूचना जारी केली. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट देण्यात आली आहे. जाणून घेऊया भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर अपडेट (ISRO Recruitment 2023)
भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (Indian space research organisation) एकूण 35 रिक्त जागांसाठी नोकरी भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी वेगवेगळ्या पदासाठी भरती आयोजित केली आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदांचा तपशील आणि वयोमर्यादा
भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian space research organisation) अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी ‘तंत्रज्ञ ‘बी’ या पदासाठी 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ड्राफ्ट्समन ‘बी’ या पदासाठी एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. उमेदवारांच्या वयोमर्यादे विषयी बोलायचं झाल्यास, उमेदवारांचे वय 18 ते 35 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian space research organisation) अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांच्या निवडी प्रक्रियेविषयी जाणून घेऊ. लेखी त्याचबरोबर कौशल्य चाचणीच्या माध्यमातून उमेदवारची निवड केली जाणार आहे. यामध्ये लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना 90 मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
80 प्रश्नांना ऐंशी गुण अशा स्वरूपात ही परीक्षा घेतली जाईल. यामध्ये उमेदवारांचा एक प्रश्न चुकल्यास, उमेदवारांचे 0.33 गुण मायनस केले जातील. लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे वर 1.5 च्या प्रमाणात कौशल्य चाचणी करिता उमेदवारांची निवड केली जाईल.
ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा फी..
दहावी उत्तीर्ण उमेदवार भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian space research organisation) अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पाचशे रुपये शुल्क आकारले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.isro.gov.in/SACRecruitment13.html असं सर्च करा. त्यानंतर या विभागाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही नोंदणी करून सविस्तर अर्ज करू शकता.
हे देखील वाचा ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..
Soaked Peanuts Benefits: रोज मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा, त्या बरोबरच मिळतील आरोग्याचे अनेक फायदे..
Shravan Special: ..म्हणून श्रावणात मांसाहार करत नाहीत; ही तीन कारणे जाणून तुम्हीही लागलीच सोडाल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम