Hyundai Exter: TATA, MARUTI एसयूव्हीचा उठला बाजार; Hyundai च्या Exeter SUV चे महिन्यातच 50 हजार बुकिंग..

0

Hyundai Exter: अलीकडच्या काळात बाजारात एसयूव्ही गाड्यांची मोठी प्रमाणात मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, आता अनेक बड्या कंपन्या कंपन्या देखील दर्जेदार एसयूव्ही गाड्यांची निर्मिती करत आहेत. टाटा मारुती या कंपन्यानंतर आता Hyundai ने देखील कमी बजेट मधील Hyundai Exter ही SUV नुकतीच लॉन्च केली आहे. Hyundai Exter या एसयूव्हीने टाटा पंच त्याचबरोबर Maruti Suzuki Fronx या SUV गाड्यांचा बाजार उठवला आहे.

Hyundai Motor India कंपनीने आपल्या नवीन एसयूव्ही गाडी विषयी माहिती देताना सांगितले, आमच्या Hyundai Exter एसयूव्हीची एकाच महिन्यात 50 हजाराहून अधिक बुकिंग झाली आहे अशी माहिती दोन दिवसापूर्वी दिली. साहजिकच यामुळे टाटा पंच आणि मारुती सुझुकीच्या Fronx या SUV वर मोठा परिणाम पडणार आहे. जाणून घेऊया या एसयूव्ही विषयी सविस्तर..

Hyundai Exter फीचर्स

Hyundai मार्केटमध्ये उतरवलेल्या Exter या एसयुव्हीमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, त्याचबरोबर टच स्क्रीन, इन्फोटेनमेंटसारख्या अनेक सुविधांसह ही कार ग्राहकांना मिळणार आहे. सेफ्टीच्या दृष्टीने ही कार अधिक मजबूत बनवण्यात आली आहे. ग्राहकांना सेफ्टी संदर्भात अनेक फीचर्स मिळाले आहेत. या कारचे स्टॅबिलिटी मॅनेजमेंट व्हीकल असणार आहे.

Hyundai या कारचे इंजिन ५ स्पीडसह येते. जे मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स बरोबर देखील जोडले गेले आहे. या गाडीचे इंजिन दमदार आहे. 81.86 BGP पॉवरसह देण्यात आले आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये या गाडीचे इंजिन 68 BHP Power सह देण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे, या गाडीला कमालीचे मायलेज देण्यात आले आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही गाडी तब्बल 19.4 किलोमीटरचा प्रवास करत असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

किंमत

Hyundai लॉन्च केलेल्या या कारची किंमत प्रचंड कमी देण्यात आली असल्याचा रिव्ह्यू आहे. किमती विषयी बोलायचं झाल्यास, या कारची किंमत सहा लाखापासून, नऊ लाख 31 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या गाडीचे टॉप मॉडेल तुम्हाला खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला नऊ लाख 31 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. Hyundai च्या कारचे तुम्हाला एकूण सात प्रकार पाहायला मिळणार आहे. ही एसयुव्ही बुकिंग करण्यासाठी तुम्हाला केवळ 11,000 रुपये भरावे लागणार आहेत.

हे देखील वाचा Soaked Peanuts Benefits: रोज मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा, त्या गोष्टी बरोबरच मिळतील आरोग्याचे अनेक फायदे..

ICC ODI World Cup 2023: युवराज म्हणतोय ते खरंच आहे, आम्ही सेट नाही; रोहितने मान्य केली युवराजने सांगितलेली ती गोष्ट..

Shravan Special: ..म्हणून श्रावणात मांसाहार करत नाहीत; ही तीन कारणे जाणून तुम्हीही लागलीच सोडाल..

Tilak Varma: तिलक वर्माच्या कामगिरीवर रोहितचे मोठे विधान; एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचे संकेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.