Shravan Special: ..म्हणून श्रावणात मांसाहार करत नाहीत; ‘ती’ तीन कारणे जाणून तुम्हीही लागलीच सोडाल..

0

Shravan Special: हिंदू धर्मामध्ये (Hindu religion) श्रावण (Shravan Maas) महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात मांसाहार (non veg) न करण्याचा सल्ला दिला जातो. या महिन्यात महादेवाची (shiva Mahadev) पूजा केली जाते. महादेवाला प्रसन्न करून घ्यायची सर्वात मोठी संधी या महिन्यात भाविकांना मिळते, असं बोललं जातं. या महिन्यात महादेवाची पूजा केल्यानंतर, तुलनेने महादेव भाविकांवर प्रसन्न होतात, असही म्हंटले जाते.

साहजिक त्यामुळे अनेकांना वाटतं, याच कारणामुळे श्रावण महिन्यात नॉनव्हेज न करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु नॉनव्हेज खाण्याचे हे धार्मिक कारण आहे. मात्र या कारणाबरोबर नॉनव्हेज न खाण्याचे वैज्ञानिक त्याचबरोबर सामाजिक कारण देखील आहे. जे तुम्हाला जाणून घेणे फार आवश्यक आहे.

..म्हणून श्रावणात नॉनव्हेज खात नाहीत

वैज्ञानिक कारण: अनेक जण व्यायाम करत असल्याने, नॉनव्हेजचे सेवन प्रत्येकालाच टाळता येत नाही. मात्र प्रत्येकाने श्रावण महिन्यात नॉनव्हेजण न खाण्याचे वैज्ञानिकांनी सामाजिक कारण देखील जाणून घेणे आवश्यक आहे. या महिन्यात नॉनव्हेजण खाण्याचे सर्वप्रथम आपण वैज्ञानिक कारण जाणून घेऊ, श्रावण महिन्यात पावसाळ्याचे दिवस असतात. त्यामुळे हवेत देखील आद्रता असते. या महिन्यात वातावरण दमट असल्याने, विषाणूंची वाढ देखील मोठ्या प्रमाणात होते.

इतर महिन्याच्या तुलनेत श्रावण महिन्यात मृत जीवांवर लगेच विषाणूंची वाढ होत असते. साहजिकच बाजारातून आपण मांस घरी आणत असतो. त्यावेळी कापण्यापासून ते मांस शिजवण्याच्या प्रक्रियेपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. त्यावर मांसावर विषाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.

मांसावर विषाणूंची वाढ झाल्याने अपचनाची समस्या देखील होते. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करू नये, असा सल्ला देण्यात येतो. श्रावण महिन्यात शिळे अन्न देखील न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. या महिन्यात इतर महिन्यांच्या तुलनेत हवेत जास्त आद्रता असते. त्यामुळे मांसाहारचे अपचन होते. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता आपण सामाजिक कारण जाणून घेऊ..

सामाजिक कारण..

श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याचा सल्ला देण्याचे एक सामाजिक कारण देखील आहे. श्रावण महिना हा प्राण्यांच्या प्रजननाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात प्राणी सर्वाधिक जास्त आपल्या प्रजातींना जन्म देतात. साजिकच त्यामुळे या महिन्यात मांसाहार केल्याने, प्राण्यांची प्रजनन प्रक्रिया थांबून प्राण्यांची संख्या नष्ट देखील होण्याची शक्यता असते. खास करून या महिन्यात माशांचा सर्वाधिक जास्त प्रजननाचा काळ असतो. आणि म्हणून या गोष्टी लक्षात घेऊन श्रावण महिन्यात नॉनव्हेज न खाण्याचा सल्ला दिला जातो.

हे देखील वाचा India Post GDS Recruitment 2023: या उमेदवारांसाठी भारतीय टपाल खात्यात 30041 जागांची मेगा भरती; असा करा अर्ज..

ICC world Cup 2023: कर्णधार चांगला असाल तरी वर्ल्ड कप जिंकण्याचं गणित वेगळं; युवराजने थेट टीमच्या वर्मावरच बोट ठेवलं..

ODI World Cup 2023: तिलक वर्माची वर्ल्ड कप संघात वर्णी; असा आहे 15 जणांचा संभाव्य ODI World Cup संघ..

IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.