India Post GDS Recruitment 2023: या उमेदवारांसाठी भारतीय टपाल खात्यात 30041 जागांची मेगा भरती; असा करा अर्ज..

0

India Post GDS Recruitment 2023: सध्या महागाई (inflation) बरोबर बेरोजगारी (unemployment) देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बेरोजगारीचा स्तर (unemployment rate) दिवसेंदिवस वाढत असला तरी काही विभागांमध्ये नोकर भरती (nokar Bharti) देखील आता केली जात आहे. भारतीय पोस्ट (India Post office) विभागाने मेगा भरती आयोजित केली असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (GDS Bharti)

जर तुम्ही देखील दहावी उत्तीर्ण असाल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. भारतीय टपाल (India Post office GDS) खात्यामध्ये तब्बल 30 हजार 41 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांना 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाणून घेऊया, या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर अपडेट..

जागांचा तपशील आणि वयोमर्यादा

इंडिया पोस्ट (India Post) ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. 23 ऑगस्ट पर्यंत उमेदवारांनी अर्ज करणे अनिवार्य आहे. जीडीएस या पदासाठी एकूण 41 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांचे शैक्षणिक वय हे 18 ते 40 या दरम्यान असणे आवश्यक आहे. (GDS)

शैक्षणिक पात्रता

भारतीय पोस्ट विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक (gramin Dak Sevak) या पदासाठी भरण्यात येणाऱ्या एकूण जागांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय आहे? हे आपण सविस्तर पाहू. जीडीएस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे महाराष्ट्र शिक्षण महामंडळाचे दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क 

भारतीय पोस्ट विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शंभर रुपये शुल्क आकारले जाईल. जर उमेदवार महिला असेल, त्याचबरोबर एससी/एसटी या प्रवर्गातून अर्ज करणार असतील, तर त्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

असा करा अर्ज

उमेदवारांना भारतीय पोस्ट विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://indiapostgdsonline.gov.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर इंडिया पोस्ट विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, होम पेजवर तुम्हाला ‘नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही आवश्यक कागदपत्रे अपलोड करा शुल्क भरा. आणि अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.

हे देखील वाचा ODI World Cup 2023: तिलक वर्माची वर्ल्ड कप संघात वर्णी; असा आहे 15 जणांचा संभाव्य ODI World Cup संघ..

Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..

Suryakumar Yadav: रोहित आणि राहुल सर मला म्हणाले…;वनडे क्रिकेटचा खेळ जमत नाही; हे काय बोलून गेला सूर्या, पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.