IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..

0

IND vs WI 3rd T20I: लगातार T-20 सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर, तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने वेस्टइंडीज संघाचा पराभव केला. या विजयाबरोबरच पाच T-20 सामन्याच्या मालिकेत मालिका विजयाचे आव्हान भारताने जिवंत ठेवले. भारतीय संघाने तिसरा T-20 सामना जिंकला असला तरी विजयापेक्षा जास्त चर्चा झाली, ती तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya Tilak Varma) कृत्यांची. (Hardik Pandya Tilak Verma video)

तिसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्टइंडीज संघाच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतर, वेस्टइंडीज संघाने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे भारतासमोर 160 धावांचा आव्हान ठेवलं. 160 धावांचे आव्हान घेऊन, मैदानात उतरणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली. ईशान किशनच्या (ishan Kishan) जागी संधी मिळालेल्या यशस्वी जयस्वाल(Yashasvi Jaiswal) देखील अपयशी ठरला.

दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर, भारत तिसरा T20 सामना देखील पराभूत होतो की काय असं वाटत होतं. मात्र सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून दिला. जगभरात टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट म्हणून आपला नावलौकिक मिळवलेल्या, सूर्यकुमार यादवने आपल्या जुन्या अंदाजात 44 चेंडूत 83 धावांची खेळी केली.

सूर्यकुमार यादव बरोबर तिलक वर्माने देखील चांगला खेळ केला. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आला. या सिरीजमध्ये पहिल्यांदाच आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणारा तिलक वर्मा लगातार दुसरे अर्धशतक साजरे करेल असं वाटत होतं. मात्र विजयासाठी दोन धावांची आवश्यकता असताना, हार्दिक पांड्याने षटकार लगावला. आणि नॉन स्ट्राइकवर तिलक वर्मा 49 धावांवरच नाबाद राहिला.

विजयानंतर प्रतिस्पर्धी खेळाडू त्याचबरोबर आपल्या संघातले खेळाडू देखील एकमेकांसोबत हस्तांदोलन करतात. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिलक वर्मा हार्दिक पांड्याने आपले अर्धशतक पूर्ण होऊ न दिल्यामुळे नाखूष असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही, तर व्हिडिओच्या अखेर आपण पाहू शकतो, हार्दिक पांड्या हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करतो. मात्र तिलक वर्मा हस्तांदोलन न करता त्याच्या हातून बॅट घेणून निघून जात असल्याचं दिसत आहे.

हार्दिक पांड्याने नवख्या खेळाडूंचे अर्धशतक पूर्ण होऊ द्यायला हवं होतं अशी टीका कालपासून होत आहे. अशातच आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, तिलक वर्मा नाराज असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. खेळाडूंनी नेहमी संघाचे हित लक्षात घ्यायचं असतं. हे जरी खरं असलं तरी नवीन खेळाडूंना आपल्या कामगिरीमुळे आत्मविश्वास वाढतो. साहजिकच त्यामुळे हार्दिक पांड्याने ही चूक करायला नको होती असं अनेकांना म्हंटले आहे.

हे देखील वाचा IND vs WI 3rd T20: टीममेंट म्हणून पांड्या निघाला भिकारडा; हार्दिकच्या त्या कृत्यावर चाहत्यांचा संताप..

Dharmaveer 2: अखेर धर्मवीर 2 ची घोषणा; सीक्वेलमधून होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जयजयकार..

Utkarsha Pawar: ऋतुराजची बायकोही आहे क्रिकेटर, लग्नामुळे माझ्या करिअरवर ..”; धोनी आणि करिअरवर स्पष्टच बोलली उत्कर्षा पवार..

love or lust relationship: प्रेम की वासना? मुली हे इशारे करत असतील तर समजून जा तिची इच्छा झालीय..

Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

Australia ODI World Cup squad: मार्नस लाबुशेनसह या दिग्गजांना डच्चू; असा आहे ऑस्ट्रेलियाचा ODI World Cup संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.