Dharmaveer 2: अखेर धर्मवीर 2 ची घोषणा; सीक्वेलमधून होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जयजयकार..

0

Dharmaveer 2: प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि मंगेश देसाई (Mangesh Desai) निर्मित धर्मवीर (Dharmaveer) हा चित्रपट लोकांच्या भेटीला आल्यानंतर, आता धर्मवीर2 (Dharmaveer 2) ची घोषणा निर्माता मंगेश देसाई यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून केली आहे. धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या सिक्वेलमध्ये धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा जीवन प्रवास पडद्यावर रंगवण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागली आहे. (Dharmaveer 2 movie shooting started)

निर्माता मंगेश देसाई यांनी धर्मवीर 2 या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर, आता प्रेक्षकांना या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. पोस्टरवरून या चित्रपटात काय असेल, याचा अंदाज थोडाफार आला आहे. मात्र प्रत्यक्षात हा चित्रपट कसा असेल, हे पाहणं देखील आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे असणार चित्रपटात..?

धर्मवीर या चित्रपटामध्ये आनंद दिघे बरोबर मुख्यमंत्री एकनाथ (eknath Shinde) शिंदे याचे देखील कार्य दाखवण्यात आले होते. धर्मवीर2 या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” अशी टॅगलाइन देखील देण्यात आली आहे. सोशल मीडियावर या पोस्टरवरून आता टिका व्हायला सुरुवात झाली आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” म्हणजे अर्थात या चित्रपटामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रमोशन केले जाणार असल्याची टीका होऊ लागली आहे.

धर्मवीर या चित्रपटांमधून देखील एकनाथ शिंदे यांनाच प्रमोट करण्यात आलं. अशी देखील त्यावेळी टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मांडली जाणार असून, उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी देखील चर्चा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगताना पाहायला मिळत आहे.

..म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होणार प्रमोशन..

धर्मवीर-2 या चित्रपटाची निर्मिती केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमोशन करण्यासाठी केली जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, एकनाथ शिंदे हेच हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असल्याचा केविलवाणा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. अशी एकीकडे सोशल मीडियावर टीका होत असली तरी, दुसरीकडे मात्र या चित्रपटात नक्की काय असेल, याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे.

हे देखील वाचा IND vs WI 3rd T20: टीममेंट म्हणून पांड्या निघाला भिकारडा; हार्दिकच्या त्या कृत्यावर चाहत्यांचा संताप..

Utkarsha Pawar: ऋतुराजची बायकोही आहे क्रिकेटर, लग्नामुळे माझ्या करिअरवर ..”; धोनी आणि करिअरवर स्पष्टच बोलली उत्कर्षा पवार..

Lust Video Viral: तरुणीच्या सीटवर बसला, अन् भरलेल्या बसमध्येच हस्तमैथुन करू लागला; पाहा तो व्हिडिओ..

World Cup 2023 prediction: इंडिया नाही हे दोन संघ जाणार फायनलमध्ये! हे चार संघ गाठणार सेमीफायनल; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.