World Cup 2023 prediction: इंडिया नाही हे दोन संघ जाणार फायनलमध्ये! हे चार संघ गाठणार सेमीफायनल; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी..

0

World Cup 2023 prediction: क्रिकेट चाहत्यांना आता ऑक्टोंबर पासून भारतामध्ये सुरु होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची उत्सुकता लागली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi cricket stadium) वनडे विश्वचषकाची फायनल खेळवली जाणार आहे. वन डे विश्वचषक (world Cup 2023) भारतामध्ये होणार आहे. शिवाय 2013 पासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नसल्याने, या वर्ल्डकपला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..

एकीकडे 2013 पासून भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ अपयशी ठरल्याने, आयसीसी स्पर्धेत सातत्याने भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 2011 साली भारतामध्ये झालेला विश्वचषक जिंकत तब्बल 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचे स्वप्न पूर्ण झालं. यावर्षी देखील वन डे विश्वचषक भारतामध्ये होणार असल्याने, पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याच्या आशा अनेकांना आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (glenn mcgrath) मोठी भविष्यवाणी केली आहे. (glenn mcgrath prediction World Cup 2023) सलग दोन पराभवानंतर हार्दिकचा मोठा निर्णय! या दोघांच्या जागेवर दोन धाकड खेळाडूची संघात एन्ट्री..

एकीकडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या दृष्टीने भारतीय संघ तयारीला लागला असतानाच, भारतीय संघाचा कॉन्फिडन्स डाउन करणारे विधान ग्लेन मॅकग्राने एक प्रकारे केले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना ग्लेन मॅकग्रा म्हणाला, भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया भारत आणि पाकिस्तान हे चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.

भारत सेमी फायनलमध्ये पोहोचणार असला तरी सेमी फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा तिसरा संघ म्हणून असेल, असं ग्लेन मॅकग्राने घोषित केले. याचा अर्थ भारतीय संघ पुन्हा एकदा सेमी फायनलमध्येच पराभव होणार असल्याचे, संकेत त्याने दिले आहेत. ग्लेन मॅकग्राच्या विधानाचा सरळ अर्थ घ्यायचा झाला तर, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळतील.

भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) इंग्लंड (England) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे चार सेमी फायनलमध्ये का पोहोतील? याची कारणे देखील मॅकग्राने सांगितली आहेत. आयसीसी स्पर्धेत (ICC trophy) ऑस्ट्रेलियाचा संघ हा ताकदीनिशी मैदानात उतरतो. मोठ्या स्पर्धेत कसा खेळ करायचा, याविषयी तकडा अनुभव ऑस्ट्रेलिया संघाकडे आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभव खेळाडूंचा भरणा देखील आहेत. शिवाय दबावात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पॅनीक होत नाहीत.

भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकात इंग्लंड संघाला दुसरा फेवरेट संघ म्हणून मॅकग्राने घोषित केले आहे. याचे कारण देताना तो म्हणाला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ दमदार कामगिरी करत आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी सातत्याने दमदार कामगिरी केली असल्याने, यावेळी देखील ते विश्वचषकात प्रमुख दावेदार असतील. याशिवाय इंग्लंड खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळतात. त्याचा देखील फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.

भारतात होणाऱ्या विश्वचषकाचा तिसरा फेवरेट संघ भारताला घोषित करताना मॅकग्रा म्हणाला, अर्थात वर्ल्डकप भारतामध्ये होणार असल्याने भारतीय संघाला त्याचा फायदा निश्चितच होईल. पाकिस्तान संघ देखील आशिया खंडात चांगली कामगिरी करत असल्याने, ते देखील भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे दावेदार असतील.

हे देखील वाचा Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

WI vs IND 3rd T20: पराभवानंतर हार्दिकचा मोठा निर्णय! या दोघांच्या जागेवर दोन धाकड खेळाडूची संघात एन्ट्री..

Rohit Sharma on T20 world cup 2024: T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.