WI vs IND 3rd T20: पराभवानंतर हार्दिकचा मोठा निर्णय! या दोघांच्या जागेवर दोन धाकड खेळाडूची संघात एन्ट्री..

0

WI vs IND 3rd T20: भारत आणि वेस्टइंडिज (IND vs WI T20 series) यांच्यामध्ये पाच T20 सामन्याची मालिका सुरू आहे पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामना करावा लागला. दोन्ही T20 सामन्यात फलंदाजी अपयशी ठरल्याने भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी संघ निवडीवर देखील आता टीका होऊ लागली आहे. सलग दोन पराभवामुळे आता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात आम्ही टी-ट्वेंटी विश्वचषकाची (T20 World Cup 2024) तयारी म्हणून (BCCI) ने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अनेक नवीन संधी दिली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli);या दिगज्ज खेळाडूंना वगळून टी-ट्वेंटीचा नवा संघ बांधायला सुरुवात झाली. मात्र आता आव्हानात्मक खेळपट्टीवर नवीन खेळाडू चाचपडताना पाहायला मिळत आहेत.

दोन्ही T20 मध्ये दोन्ही सलामीवीर (Indian openers) त्याचबरोबर मधल्या क्रमांकाचे फलंदाज देखील अपयशी ठरले. त्यामुळे आता भारतीय फलंदाजी मजबूत करण्याच्या दृष्टीने तिसऱ्या t20 मध्ये संघ निवडला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही T20 सामन्यात केवळ दोनच षटके गोलंदाजी केलेल्या अक्षर पटेलला (Axar Patel) वगळलं जाऊ शकतं. अक्षर पटेलच्या जागेवर यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.

संजू बाहेर…

आठ वर्षांमध्ये केवळ तीस आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या संजू सॅमसनवर (Sanju Samson) देखील आता टीका होऊ लागली आहे. सलग दोन टी ट्वेन्टी सामन्यात अपयशी ठरल्याने त्याला देखील आता बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. संजू सॅमसनच्या जागेवर यशस्वी जयस्वालला देखील संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यात या दोन बदलांबरोबर रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याला देखील बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. रवी बिष्णोईच्या जागी लेगस्पिनर कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) संघात समावेश केला जाऊ शकतो. कुलदीप यादवच्या जागेवर रवी बिष्णोईला दुसऱ्या t20 सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने 4 षटकात 31 धावा दिल्या. यामध्ये त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

असा असेल तिसऱ्या T-20 साठी भारतीय संघ

शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (विकेटकीपर) सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन) संजू सॅमसन कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

हे देखील वाचा WI vs IND 2nd T20: हार्दिक पांड्याच्या त्या एका चुकीमुळे भारताने जिंकलेला सामना गमावला; दिग्गजांनीही केली जोरदार टीका..

Rohit Sharma on T20 world cup 2024: T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..

Drunk Woman and Police viral video: त्या कारणामुळे नशेत असणाऱ्या तरुणीने थेट पोलिसांशी केले दोन हात; कॉलर पकडत म्हणाली..

Snake viral video: जिवंत उंदरला सापाने गिळले, उंदीर पोट कुरतडून बाहेर आले; पाहा हा खतरनाक व्हिडिओ..

Ileana DCruz Baby Boy: नवऱ्याविना इलियाना झाली आई; तुम्हालाही माहित नाही इलियानाच्या बाळाचा पिता? मग वाचा सविस्तर..

Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.