IND vs WI 3rd T20: टीममेंट म्हणून पांड्या निघाला भिकारडा; हार्दिकच्या त्या कृत्यावर चाहत्यांचा संताप..

0

IND vs WI 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यामध्ये काल खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात अखेर भारतीय संघाला सुर सापडला. तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाचा एकतर्फी पराभव करत मालिकेत 2-1असं कमबॅक केलं. पुन्हा एकदा भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. ईशान किशनच्या (Ishan Kishan) जागेवर यशस्वी जयस्वालला Yashasvi Jaiswal) पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र तो अपयशी ठरला. (India beat West Indies)

पहिल्या दोन T20 मध्ये वेस्ट इंडिज संघाने भारताचा पराभव करत पाच टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली. मात्र मालिका विजयाच्या निश्चयाने मैदानात उतरणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पुन्हा एकदा भारताचे सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर, मधल्या क्रमांकाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ केला. आणि भारताचा विजय साकारला. (Surya Kumar Yadav Tilak Verma superb innings again West Indies)

गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेर सुर गवसला. तिसऱ्या T-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने आपल्याच अंदाजात फटकेबाजी करत 49 चेंडूत 83 धावांची खेळी सादर केली. सूर्यकुमार यादवला तिलक वर्माने (tilak Varma) देखील चांगली साथ दिली. वेस्टइंडीज विरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन T20 सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा तिलक वर्माच्या नावावर आहेत.

तिलक वर्माला लगातार दुसरे अर्धशतक साजरं करण्याची संधी होती. मात्र हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) चुकीमुळे आपल्या करिअरचं दुसरं अर्धशतक साजरं करण्यापासून तिलक वर्मा वंचित राहिला. त्याचं झालं असं भारताला विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. हार्दिक पांड्या स्ट्राइकवर होता. नॉन स्ट्राइकरवर असणाऱ्या तिलक वर्माला आपले दुसरे अर्धशतक साजरं करण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता होती.

हार्दिक पांड्याने जर धाव काढून तिलक वर्माला स्ट्राइक दिली असती, तर कदाचित त्याचं अर्धशतक पूर्ण झालं असतं. मात्र हार्दिक पांड्याने एक धाव न घेता षटकार मारला. साहजिक त्यामुळे त्याला 49 या धावसंख्येवर नाबाद राहण्याची वेळ आली. हार्दिक पांड्याच्या या कृत्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

स्वतःला महेंद्रसिंग धोनीचा शिष्य मानणाऱ्या हार्दिक पांड्याला, महेंद्रसिंग धोनीच्या कृत्याची देखील अनेकांनी आठवण करून दिली. टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. विजयासाठी एका धावेची आवश्यकता होती महेंद्रसिंग धोनी स्ट्राइकवर होता. षटकामधील अखेरचा चेंडू तो फेस करत होता.

विराट कोहलीच्या हातून भारताने विजयी धाव घ्यावी, यासाठी धोनीने चेंडू डिफेन्स केला. इथे मात्र हार्दिक पांड्याने तिलक वर्माचे अर्धशतक पूर्ण होण्यासाठी कोणताही विचार न करता षटकार लगावला. साहजिकच हार्दिक पांड्याच्या कृत्यामुळे सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं जात आहे.

हे देखील वाचा WI vs IND 3rd T20: पराभवानंतर हार्दिकचा मोठा निर्णय! या दोघांच्या जागेवर दोन धाकड खेळाडूची संघात एन्ट्री..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

Australia ODI World Cup squad: मार्नस लाबुशेनसह या दिग्गजांना डच्चू; असा आहे ऑस्ट्रेलियाचा ODI World Cup संघ..

Rohit Sharma on T20 world cup 2024: T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..

love or lust relationship: प्रेम की वासना? मुली हे इशारे करत असतील तर समजून जा तिची इच्छा झालीय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.