Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

0

Acharya Chanakya on success: जीवनात (Life) यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. दिवस रात्र मेहनत करून देखील अनेकांच्या पदरी अपयश पडतं. जर तुम्हाला देखील प्रयत्न करून यश मिळत नसेल, तर चाणक्याने सांगितलेल्या नीतीचा अवलंब करा. यश, ध्येय प्राप्त करायचं असेल, तर कष्टाला पर्याय नाही, हे वाक्य तुम्ही रोज अनेकांच्या तोंडून ऐकता. मात्र अफाट मेहनत करून देखील कित्येकदा यश मिळत नाही. (Acharya Chanakya on success)

आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (chanakaya niti) या ग्रंथामधून त्यांनी मनुष्याच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. यशस्वी जीवनाविषयी देखील त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. जीवनात ध्येय प्राप्त करायचा असेल, तर तुम्हाला देखील चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीचा अवलंब करावाच लागेल.

व्यसनं केन न प्राप्तं कस्य सौख्यं निरन्तरम् ।कस्य दोष: कुले नास्ति व्याधिना को न पिडित!

यशस्वी जीवनाविषयी भाष्य करताना आचार्य चाणक्य सांगतात, या जगामध्ये सर्वगुण संपन्न कोणीही नाही. प्रत्येकाला काही ना काही गोष्टींचं व्यसन हे असतंच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान या गोष्टी येत जात राहतात. मात्र संकटामध्ये जो मनुष्य कधीही खचत नाही, तोच यश मिळवू शकतो, असं चाणक्य सांगतात.

आयुष्यामध्ये मार्गक्रम करताना तुमच्या अवतीभवती देखील संकटे असतात. अनेकदा आपल्याला लाभलेला सहवास आपल्यासाठी गुणकारी आहे, की विकारी आहे? याची देखील आपल्याला वेळीच माहिती मिळत नाही. जवळची लोकं अनेकदा फसवतात. मात्र जवळच्या माणसांनी फसवल्यानंतरही, तुम्ही कशा प्रकारे त्यावर मात करत मार्गक्रमण करता यावर सगळं काही अवलंबून आहे.

चाणक्य सांगतात, यश मिळवणे इतकं सोपही नाही आणि अवघडही नाही. तुमच्या त्याकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता, यावर तुमच्या यशाचं गमक दडलेलं असतं. जर तुम्ही अपयशाने खचून जाणार नसाल, तर यश निश्चितच यश मिळेल. कोणतेही कार्य करताना तुम्ही अपयशाची चिंता करता कामा नये. अपयश येईल, या भीतीने जो मनुष्य जीवन जगत करतो, अशांना यश कधीच मिळत नाही, असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..

WI vs IND 3rd T20: पराभवानंतर हार्दिकचा मोठा निर्णय! या दोघांच्या जागेवर दोन धाकड खेळाडूची संघात एन्ट्री..

love or lust relationship: प्रेम की वासना? मुली हे इशारे करत असतील तर समजून जा तिची इच्छा झालीय..

Smartphones Under 10000: Amazon वर भन्नाट सेल! दहा हजारापेक्षा कमी किंमतीत मिळतायत हे तगडे स्मार्टफोन..

Australia ODI World Cup squad: मार्नस लाबुशेनसह या दिग्गजांना डच्चू; असा आहे ऑस्ट्रेलियाचा ODI World Cup संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.