ODI World Cup 2023: तिलक वर्माची वर्ल्ड कप संघात वर्णी; असा आहे 15 जणांचा संभाव्य ODI World Cup संघ..

0

ODI World Cup 2023: यावर्षी वनडे विश्वचषक (ODI World Cup) भारतामध्ये खेळवला जाणार आहे. 5 ऑक्टोंबर ते 19 सप्टेंबर यादरम्यान भारतामध्ये 50 षटकांचा विश्वचषक खेळवला जाईल. भारतामध्ये वर्ल्डकप होणार असल्याने, भारत 2023 च्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारत प्रबळ दावेदार असला तरी, देखील खरंच भारतीय संघ आपला अंतिम संघ तयार करू शकला आहे का?

यावर्षी भारतामध्ये विश्वचषक होणार असला तरी अद्यापही भारतीय टीम सेट झालेली पाहायला मिळत नाही. भारतीय संघाचे पंधरा सदस्य जवळपास निश्चित असले तरी अंतिम 11 मैदानात कोण उतरतील? हे कोणीही सांगू शकणार नाही. अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. जाणून घेऊया भारतीय विश्वचषक संघात कोणते पंधरा सदस्य असतील..

विश्वचषक स्पर्धेच्या संघ निवडीचे मोठे आव्हान निवड समिती पुढे असणार आहे. पाच सहा खेळाडू सोडले तर उर्वरित कोणते खेळाडू भारतीय संघामध्ये निवडायचे, हा मोठा प्रश्न निवड समिती पुढे आहे. असं असलं तरी देखील आता संभाव्य पंधरा सदस्य कोण असतील, यावर एक नजर टाकुया.

सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (rohit sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या दोघांना संधी देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी अर्थात विराट कोहली (Virat kohli) हे नाव निश्चित आहे. पाचव्या क्रमांकासाठी अनेक खेळाडूंमध्ये रस्सीखेच आहे. जर केएल राहुल (kl Rahul) दुखपतीतून सावरला नाही, विकेट किपर म्हणून, संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळण्याची शक्यता आहे. जर केएल राहुलने आशिया स्पर्धेत पुनरागमन केलं, तर संजू सॅमसनचा संभाव्य पंधरा मधून देखील पत्ता कट होईल.

राहुलला बॅकअप विकेटकीपर फलंदाज म्हणून ईशानच नाव निश्चित होणार असल्याची चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे, किशन सलामीची जबाबदारी देखील पार पाडू शकतो. मात्र जर केएल राहुल आशिया चषक स्पर्धेत (asia cup 2023) परतला नाही, तर भारताच्या विश्वचषक संघात संजू सॅमसनला विकेटकीपर फलंदाज म्हणून निवडले जाईल.

चौथ्या क्रमांकासाठी देखील भारताच्या संघात संधी मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये चुरस आहे. श्रेयस अय्यर (shreyas Iyer) देखील दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग नाही. जर तो देखील आशिया चषक स्पर्धेत परतला नाही, तर त्याच्या जागेवर सूर्यकुमार यादवला (SuryaKumar yadav) संधी देण्यात येईल. मात्र सूर्यकुमार यादवचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये फॉर्म फारच खराब आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला पर्याय म्हणून, तिलक वर्माचे (Tilak Varma) एकदिवसी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये तिलक वर्माने दमदार खेळ सादर केला आहे. आपल्या पदार्पणातच त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत,अनेकांना प्रभावित केले आहे. डावखुरा फलंदाज असल्याने, मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याविषयी अनेकांचे एकमत झालं आहे. साहजिकच या सगळ्यांचा फायदा त्याला होणार असल्याची शक्यता आहे. (Tilak Varma in ODI World squad)

सहाव्या क्रमांकासाठी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड केली जाईल यामध्ये बिलकुल ही शंका नाही. हार्दिक पांड्याला पर्याय खेळाडू म्हणून, शार्दुल ठाकूरची (shardul Thakur) देखील 15 च्या संभाव्य यादीमध्ये नंबर लागू शकतो. त्याचबरोबर सातव्या क्रमांकासाठी रवींद्र जडेजा (ravindra jadeja) असेल. रवींद्र जडेजाला बॅकअप खेळाडू म्हणून अक्षर पटेलला (axar patel) संधी मिळेल.

गोलंदाजाविषयी बोलायचं झाल्यास भारतीय गोलंदाजी जवळपास सेट मानली जात आहे. जलदगती गोलंदाजाची जबाबदारी जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) मोहम्मद शमी (Mohammed Shami) मोहम्मद सिराज (mohammed siraj) हे तीन हे तिघे पार पाडतील. तर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या दोघांपैकी अंतिम अकरामध्ये एक असेल, मात्र 15 खेळाडूंच्या संभाव्य यादीमध्ये या दोघांचाही समावेश असेल.

हे देखील वाचा Suryakumar Yadav: रोहित आणि राहुल सर मला म्हणाले…”; वनडे क्रिकेटचा खेळ जमत नाही; हे काय बोलून गेला सूर्या, पाहा व्हिडिओ..

IND vs WI 3rd T20: टीममेंट म्हणून पांड्या निघाला भिकारडा; हार्दिकच्या त्या कृत्यावर चाहत्यांचा संताप..

IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..

Australia ODI World Cup squad: मार्नस लाबुशेनसह या दिग्गजांना डच्चू; असा आहे ऑस्ट्रेलियाचा ODI World Cup संघ..

World Cup 2023 prediction: इंडिया नाही हे दोन संघ जाणार फायनलमध्ये! हे चार संघ गाठणार सेमीफायनल; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.