India team for Asia Cup 2023: आज होणार आशिया, वर्ल्ड कप संघाची निवड; तिलकच्या निवडीला हिरवा कंदील, असा असेल भारतीय संघ…

0

India team for Asia Cup 2023: गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषक (asia Cup) स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आशिया चषक स्पर्धा भारतीय संघाने सर्वाधिक वेळा जिंकलेली आहे. मात्र गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला श्रीलंकेकडून देखील दारुण पराभवाला सामना करावा लागला होता. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या दरम्यान आशिया चषक स्पर्धा पार पडेल. यासाठी आज भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. (India team for Asia Cup 2023)

5 ऑक्टोबर पासून भारतामध्ये विश्वचषकाचे देखील बिगुल वाजणार आहे. साहजिकच भारतामध्ये विश्वचषक होणार असल्याने, भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाबरोबर क्रिकेट चाहते देखील 2023 चा विश्वचषक जिंकण्यासाठी आतुर आणि उत्सुक आहेत. असं असले तरी भारतीय संघाची टीम अद्याप निवडली गेली नाही. आणि सेटल देखील पाहायला मिळत नाही. अशातच आता निवड समिती समोर आशिया चषक स्पर्धेसाठी आज संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी निवडला जाणार संघ हाच एकदिवसीय विश्वचषकासाठी देखील निवडला जाणार आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष अजित आगरकर (ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या निवड समितीच्या बैठकीकडे आहे. भारतीय संघासाठी वेस्टइंडीज दौरा फार फायदेशीर ठरला नाही. मात्र या दौऱ्यातून काही खेळाडूंची कामगिरी दमदार राहिली आहे. यामधील दोन खेळाडूंचा भारतीय आशिया चषक आणि विश्वचषकाच्या संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

यामधील एक नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे. भारताच्या आशिया चषक स्पर्धेत आणि विश्वचषकाच्या संघात देखील तिलक वर्माचा (Tilak Varma) समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. याविषयी निवड समिती आणि BCCI यांच्यामध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. भारतीय मधल्या फळीत कोणताही डावखुरा फलंदाज नाही. शिवाय तिलक वर्माने वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या टी ट्वेंटी मालिकेत दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. शिवाय त्याच्याकडे एक चांगला ऑफ स्पिनर हा विकल्प म्हणून देखील पाहिले जात आहे.

आशिया चषक स्पर्धेत केएल राहुल (kl Rahul) आणि श्रेयस अय्यर (shreyas Iyer) या दोघांचे पुनरागमन होणार की नाही, याविषयी अद्याप काही माहिती मिळाली नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजू सॅमसनला (sanju Samson) डच्चू मिळणार आहे. याशिवाय अक्षर पटेलचा देखील संघात समावेश केला जाणार नसल्याची माहिती आहे. शार्दुल ठाकूरचा (shardul Thakur) मात्र संघात समावेश केला जाणार आहे.

असा असेल Asia Cup साठी भारतीय संघ..

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव तिलक वर्मा, ईशान किशन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, चहल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर

हे देखील वाचा Hardik Pandya: मालिका पराभवामुळे नाही, हार्दिकच्या त्या चार चुका आणि मूर्ख विधानामुळे T20 कर्णधारपद धोक्यात..

Age for Marriage: या गोष्टी टाळण्यासाठी आणि नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी याच वयात लग्न करणं आवश्यक; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..

ISRO Recruitment 2023: दहावी पास असाल तर लगेच या पद्धतीने करा अर्ज; ISRO मध्ये निघालीय मोठी भरती..

Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.