Asia Cup 2023 1St match: वर्ल्ड कप सोडा, या चार चुकामुळे भारत आशिया कपही जिंकू शकणार नाही..

0

Asia Cup 2023 1St match: भारतीय संघाला 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारतीय संघाकडे अंडर19 पासून ते भारताच्या मुख्य संघात देखील अनेक दर्जेदार आणि तुल्यबळ खेळाडू आहेत. मात्र तरीदेखील भारतीय संघाला (indian team) आयसीसी स्पर्धेत (ICC trophy) चांगली कामगिरी करता आलेली नाही. इतर संघांकडे भारतापेक्षा कमी दर्जाचे खेळाडू असून, देखील अनेक संघांनी आयसीसी स्पर्धेत भारतापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया या संघांचा देखील समावेश आहे.

2011 नंतर आता यावर्षी भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. साहजिकच विश्वचषक (world Cup 2023) भारतात होणार असल्याने, विश्वचषक जिंकण्याच्या अपेक्षा अनेकांना आहेत. विश्वचषकात भारत प्रबळ दावेदार मानला जात असला तरी भारता समोर असंख्य आव्हानं देखील आहेत. विश्वचषक जिंकण्याची भारताने किती तयारी केली आहे? याचा अंदाज आशिया चषक स्पर्धेतच येणार आहे.

2021 नाव 2022 मध्ये झालेला टी ट्वेंटीचा विश्वचषक संघ, आणि आता आशिया चषक स्पर्धेत देखील भारतीय संघ जवळपास सेम आहे. फक्त संघच नाही, तर भारतीय संघात समस्या देखील त्याच अधोरेखित होताना दिसत आहेत. विश्वचषकात भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात असलं तरी, वस्तुस्थिती वेगळी आहे. भारतीय संघात अध्यापही चार समस्या कायम आहेत. ज्यामुळे भारत केवळ विश्वचषकच नव्हे, तर आशिया स्पर्धा देखील गमावू शकतो.

एका लेग स्पिनरची उणीव

निवड समितीने नुकतीच आशिया चषक स्पर्धेसाठी 17 सदस्यांची निवड केली. अनेकांकडून निवड समितीवर टीका होत असली तरी, सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो एका लेग स्पिनरचा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या षटकात स्पिनर्स डावाला आकार देतात. विश्वचषक भारतात होणार असल्याने, स्पिनर खूप महत्त्वाचा रोल पार पाडतील. मात्र भारताकडे केवळ एकच स्पिनर आहे, तो देखील चायनामन आहे. युझवेंद्र चहलची संघाला उणीव निश्चित भासणार आहे.

चौथ्या क्रमांकाचा प्रश्न..

युवराज सिंग नंतर भारतीय संघाला अद्याप चौथ्या क्रमांकाचा फलंदाज शोधता आला नाही. अनेक खेळाडूंनी या क्रमांकावर फलंदाजी केली मात्र एकही खेळाडूला आपलं स्थान निश्चित करता आलं नाही. या विश्वचषकात देखील भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाची उणीव भासणार असून, याची प्रचिती आशिया स्पर्धेत देखील दिसेल.

श्रेयस अय्यर केएल राहुलचा फॉर्म आणि फिटनेस…

श्रेयस अय्यर आणि केएल राहुल गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाहीत. दुखापतीमुळे या दोघांना क्रिकेट पासून दूर राहावे लागले आहे. आता या दोघांचे आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन झाले आहे. मात्र अद्याप केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. शिवाय या दोघांचा फॉर्म कसा राहतो, याची देखील चिंता संघाला असेल.

दबावात सुमार कामगिरीचा इतिहास…

गेल्या काही आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाला दबावाचा सामना करण्यात अपयश आलं आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाचे अनेक खेळाडू नांग्या टाकताना दिसतात. यामध्ये केएल राहुल आघाडीवर आहे. जर या वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघ दबावाला हँडल करू शकला नाही, तर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हाती निराशा लागण्याची आधी शक्यता आहे.

हे देखील वाचा  Asia Cup 2023 squad: ..म्हणून भाजपच्या खासदाराने मोहम्मद शमीच्या निवडीवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाला त्याच्या जागी..

Asia Cup 2023 India squad: ..म्हणून चहलची निवड केली नाही; अजित आगरकरच्या उत्तराने दिग्गजांचा संताप..

face beauty tips: तुम्हीही रात्री चेहरा न धुता झोपता? जाणून घ्या चेहरा धुवून झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे..

Jio recharge Plans: जियोचे दोन भन्नाट प्लॅन! Netflix चे Subscription मोफत आणि 3GB डेटा प्रतिदिन..

Chanakya Niti for Women: या स्त्रियांशी जवळीक केली, तर आयुष्य उध्वस्त होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.