Jio recharge Plans: जियोचे दोन भन्नाट प्लॅन! Netflix चे Subscription मोफत आणि 3GB डेटा प्रतिदिन..

0

Jio recharge Plans: ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने सुरुवातीचे एक वर्ष मोफत अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंगची सुविधा दिली. टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर OTT क्षेत्रात देखील जियोने आपला जम बसवला आहे. अलीकडे OTT Platform चे असंख्य ग्राहक असल्याने, मोठ्या रिचार्जला मागणी देखील वाढली आहे.

ओटीपी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार कॉन्टेन्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्याने, आता Netflix, ॲमेझॉन सारख्या ओटीपी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रीप्शनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्ही देखील Netflix या OTT Platform चे सबस्क्रीप्शन मोफत मिळवू इच्छित असाल, तर जियोने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे.

जिओचे दोन दमदार प्रीपेड प्लॅन निश्चित झाले आहेत. जियोने लॉन्च केलेल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1,099 रुपये आणि 14,99 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. यासाठी ग्राहकांना प्रति दिवस दोन जीबी डाटा दिला जाईल. सोबतच नेटफ्लिक्सचे Subscription देखील मोफत मिळणार आहे. या दोन्ही रिचार्जची वैधता 84 दिवसाची असणार आहे.

1,499 रुपयांच्या प्लॅनविषयी सविस्तर सांगायचं झाल्यास, ग्राहकांना रोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची देखील वैधता ग्राहकांना 84 दिवसाची असणार आहे. सोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज शंभर एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix Subscription अगदी मोफत मिळणार आहे. मात्र हे OTT Platform एका वेळी एकाच डिव्हाइसवर पाहण्याची मर्यादा असणार आहे.

जिओनी लॉन्च केलेल्या या दोन प्रीपेड रिचार्ज प्लानची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. जियो आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी असे प्लॅन बाजारात उतरवत असतं. ग्राहकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी आता पुन्हा एकदा जियोने भन्नाट रिचार्ज प्लॅन आणले असून, ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा देखील होत आहे. खास करून ओटीपी प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या युजरसाठी हा प्लॅन खूप फायदेशीर आहे.

हे देखील वाचा Indian ODI team for Asia Cup 2023: 21 तारखेला होणार Asia Cup, World Cup साठी संघ जाहीर; समितीसोबत रोहीतही उपस्थित, या खेळाडूसाठी आग्रही..

Chanakya Niti for Women: या स्त्रियांशी जवळीक केली, तर आयुष्य उध्वस्त होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

face beauty tips: तुम्हीही रात्री चेहरा न धुता झोपता? जाणून घ्या चेहरा धुवून झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे..

Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.