Indian ODI team for Asia Cup 2023: 21 तारखेला होणार Asia Cup, World Cup साठी संघ जाहीर; समितीसोबत रोहीतही उपस्थित, या खेळाडूसाठी आग्रही..

0

Indian ODI team for Asia Cup 2023: 30 ऑगस्ट पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी आशिया कप (asia cup 2023) स्पर्धेचा संघ 21 ऑगस्टला जाहीर होणार आहे. भारतामध्ये पाच ऑक्टोंबर पासून एकदिवसीय विश्वचषकाला (ICC ODI world cup 2023) सुरुवात होणार आहे. विश्वचषक भारतात होणार असल्याने अनेकांचे या विश्वचषकाकडे लक्ष लागलं आहे. साहजिक त्यामुळे आशिया चषक स्पर्धेसाठी निवडला जाणार संघ हाच संघ वर्ल्डकपमध्ये देखील खेळेल. त्यामुळे सोमवारी 21 ऑगस्टला होणाऱ्या संघ निवडीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. (Indian ODI team for Asia Cup 2023)

अनेक इंटरनॅशनल क्रिकेट संघाने आगामी विश्वचषकासाठी आपले संघ जाहीर केले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे देखील नाव आहे. भारतीय संघाने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघाचा मिडल ऑर्डर अद्याप सेट नाही. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये कोण-कोणत्या फलंदाजांना संधी मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (shreyas Iyer) यांच्या भारतीय संघात सहभागा संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. केएल राहुल (kl Rahul) अशिया कप (asia cup) स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असेल, असे बोलले जात आहे. मात्र श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दुसरीकडे राहुलचा फॉर्म देखील चिंतेचा विषय असल्याने, आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ कसा निवडायचा? हा मोठा पेच निवड समिती समोर असणार आहे. (Indian chief selection committee)

सोमवारी 21 ऑगस्टला दिल्लीमध्ये निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit agarkar) यांच्या उपस्थितीत संघ निवडीची बैठक पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या बैठकीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील उपस्थित राहणार आहे. युवराज सिंग नंतर भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज अध्यापही मिळाला नसल्याचे स्वतः रोहित शर्माने कबूल केलं होतं. निवड प्रक्रियेमध्ये देखील हाच महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

श्रेयस अय्यर आणि केएल राहुल भारतीय संघाचा भाग होते, तेव्हा विश्वचषकासाठी हाच संघ असेल असं जवळपास स्पष्ट होतं. मात्र या दोघांच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अंतिम अकाराचे गणित कोलमडले. केएल राहुल पूर्णपणे फिट झाला असला तरी आता वर्ल्ड कपसाठी कमी काळ शिल्लक राहिला आहे. अशात त्याचा फॉर्म देखील कसा राहतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सूत्रांकडून, रोहित शर्मा चौथ्या क्रमांकासाठी तिलक वर्माचं नाव सुचवू इच्छित असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय संघात मधल्या फळीत एकही डावखुरा खेळाडू नाही. अशावेळी तिलक वर्माचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा देखील यासाठी अनुकूल आहे. किंबहुना तिलक वर्माचा भारतीय संघात समावेश होण्यासाठी रोहित आग्रही देखील असल्याची माहिती मिळाली आहे.

तिलक वर्माने वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन केलं. त्याचेच फलित म्हणून, त्याला भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. तिलक वर्माच्या समावेशामुळे श्रेयस अय्यरचा पत्ता जवळपास कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे वेस्टइंडीज विरुद्धच्या टी-ट्वेन्टी सिरीजमध्ये सुमार कामगिरी राहिलेल्या संजू सॅमसनवर (Sanju Samson) देखील टांगती तलवार आहे.

हे देखील वाचा face beauty tips: तुम्हीही रात्री चेहरा न धुता झोपता? जाणून घ्या चेहरा धुवून झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे.

Atal Pension Yojana: दर महिन्याला भरा फक्त 210 रुपये,आणि वर्षाला मिळावा 60 हजार; जाणून घ्या केंद्राची ही भन्नाट योजना..

almond benefits: सद्गुरूंनी सांगितले दारूपेक्षाही जास्त यकृतताला घातक आहेत बदाम; बदाम खात असाल तर पाहिले हे वाचा..

Acharya Chanakya on success: चाणक्यांनी सांगितलेल्या नितीचा अवलंब केल्याशिवाय, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवणं अशक्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.