NABARD Assistant Manager Recruitment 2023: या उमेदवारांना NABARD मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; तब्बल इतक्या जागा, पाहा पात्रता आणि निकष..

0

NABARD Assistant Manager Recruitment 2023: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी करू इच्छित असाल तर नाबार्ड (NABARD) म्हणजेच, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत नोकरीची मोठी संधी आहे. नावाने यासंदर्भात अधिसूचना जरी केली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 23 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. एकूण 150 रिक्त जागांसाठी करण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर.. (National Bank For Agriculture & Rural Development)

पदानुसार शैक्षणिक पात्रता..

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याचं अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी ६० टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 55 टक्के गुणांसह MBA, CA, CS, ICWA किंवा PGDM आणि Ph.D असणे आवश्यक आहे.

फायनान्स या पदासाठी ६० टक्के गुणांसह बँकिंग विषयामध्ये BBA तसेच BMA ५५ टक्के गुणांसह असायला हवे. त्याचबरोबर मॅनेजमेंट फायनान्स या विषयात PG डिप्लोमा असणे आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट अनालिसिस या विषयामध्ये त्याचबरोबर कोणत्याही शाखेमधील पदवी असणे आवश्यक आहे.

कंपनी सेक्रेटरी या पदासाठी कोणत्याही शाखेमधील पदवी किंवा CS असणे आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनीअरिंग या पदासाठी ६० टक्के गुणांबरोबर सिव्हिल या विषयामध्ये इंजिनीअरिंग, त्याचबरोबर पदवी असणे आवश्यक आहे.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या पदासाठी ६० टक्के गुण घेऊन इलेक्ट्रिकल या विषयामध्ये इंजिनीअरिंग ही पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. जिओ इन्फॉर्मेटिक या पदासाठी ६० टक्के घेऊन संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

नाबार्ड मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना मास कम्युनिकेशन, मीडिया स्पेशालिस्ट, कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, पब्लिक रिलेशन यामध्ये उमेदवाराने 60 टक्के गुणांसह पदवी संपादन केलेली असेल, तरीदेखील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने असिस्टंट मॅनेजर पदांसाठी करण्यात येणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक. उमेदवार ओबीसी या प्रवर्गातून अर्ज करत असतील, तर उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सुट दिली जाईल. तर एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाईल.

सर्वसाधारण ओबीसी आणि EWS या p वर्गातील उमेदवारांना आठशे रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. एससी/एसटी त्याचबरोबर PwBD उमेदवारांसाठी दीडशे रुपये अर्ज शुल्क स्वीकारले जाईल.

ऑनलाईन अर्ज आणि तारखा

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने असिस्टंट मॅनेजर पदांसाठी अर्ज देवांना ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. दोन सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झाली असेल 23 सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.nabard.org/hindi/ असं सर्च करा. त्यांनंतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. भरतीची जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा IND vs NE: सामना ड्रॉ झाला आणि भारताच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या टीम इंडियाच्या Super4 मध्ये पोहचण्याचे गणित..

Acharya Chanakya: त्या कारणामुळे बायका लवकर दिसतात म्हाताऱ्या; वयाचा आणि त्या गोष्टीचा आहे थेट संबंध..

IOCL Recruitment 2023: या उमेदवारांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.