IND vs NE: सामना ड्रॉ झाला आणि भारताच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या टीम इंडियाच्या Super4 मध्ये पोहचण्याचे गणित..

0

IND vs NE: अशिया कप (Asia Cup) स्पर्धेला आता सुरुवात झाली. पाकिस्तान आणि बागलादेश संघाने दोन तर उर्वरित प्रत्येक संघाचा एक-एक सामना पूर्ण देखील झाला आहे. भारतीय संघाने देखील पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळला. मात्र पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. दोन्ही संघाला एक-एक गुण देण्यात आला. ग्रुपA मधून पाकिस्तान तर ग्रुपB मधून श्रीलंका संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेत एकूण सहा संघाचा सहभाग आहे. ज्यामध्ये साखळीतून दोन संघांना बाहेर जावे लागणार आहे. तर चार संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करणार आहेत. नेपाळ वगळता या स्पर्धेतला प्रत्येक संघ कोणालाही केव्हाही पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाचा सामना अनिर्णीत राहिल्याने भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.

ग्रुप-A मधून पाकिस्तान संघ तीन गुणांसह सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाला सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी नेपाळ विरुद्ध विजय आवश्यक आहे. दुसरीकडे ग्रुप बीमध्ये मात्र तिन्ही संघांना सुपर 4 मध्ये पोहोचण्याची संधी आहे. काल बांगलादेश संघाने अफगाणिस्तान संघाला पराभूत करत दुसऱ्या सामन्यात आशिया कप स्पर्धेतील आपल्या गुणांचे खाते खोलले आहे.

आज भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये आशिया चषक स्पर्धेतला महत्त्वपूर्ण सामना पार पडणार आहे. जर नेपाळ संघाने भारतीय संघाला पराभूत करण्याची किमया केली तर मते नेपाळचा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने, काहीही होऊ शकतं. त्यातच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पिता झाल्याने, तो थेट सुपर फोर मधील सामन्यात खेळणार आहे.

तर भारत बाहेर..

खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. यापूर्वी अनेक बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया अनेक कमकुवत संघानी करून दाखवली आहे. 2007 च्या विश्वचषकात बांगलादेश संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. 2011 च्या विश्वचषकात आयर्लंड संघाने इंग्लंडला पराभूत केले होते. नुकत्याच वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात वेस्टइंडीज संघाला देखील नेदरलँड कडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जर आजच्या सामन्यातही नेपाळ संघाने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली, तर आणखी एक नवा इतिहास रचला जाईल. या इतिहासाबरोबरच भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाला सुमार कामगिरीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर जावं लागण्याची नामुष्की ओढवली जाईल. आजचा सामना दुपारी तीन वाजता स्टार स्पोर्ट आणि हॉटस्टार या ott platform वर सुरू होईल.

दुसरीकडे ग्रुपB मध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना होणार आहे. या सामन्यानंतर ग्रुपB चे गणित स्पष्ट होईल. बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तान संघाचे रनरेट मायनसमध्ये गेले आहे. आणि म्हणून आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तान संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

हे देखील वाचा Asia Cup 2023 IND vs PAK: ..म्हणून आशिया चषकात हे तीन खेळाडू अपयशी ठरले तर वर्ल्ड कपचा पत्ता होणार कट; BCCI चा प्लॅन तयार..

Jio recharge Plans: जियोचे दोन भन्नाट प्लॅन! Netflix चे Subscription मोफत आणि 3GB डेटा प्रतिदिन..

Chanakya Niti for Women: या स्त्रियांशी जवळीक केली, तर आयुष्य उध्वस्त होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.