India Squad For ODI World Cup 2023: या तीन खेळाडूंना मिळाला डच्चू; असा आहे वर्ल्ड कपसाठी भारताचा पंधरा सदस्यीय संघ..

0

India Squad For ODI World Cup 2023: वर्ल्ड कपच्या (world Cup 2023) दृष्टीने आशिया चषक स्पर्धा (asia Cup 2023) भारतीय संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी अजित आगरकर (ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 17 सदस्यांचा संघ निवडण्यात आला होता. तर संजू सॅमसंगच्या रूपात एक खेळाडू राखीव म्हणून घोषित करण्यात आला होता.

भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या आशिया चषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यानंतर अजित आगरकरने राहुल द्रविड (rahul dravid) आणि कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत वर्ल्डकप संघ निवडीवर चर्चा केली आहे. अशिया कप स्पर्धेसाठी संघ निवडल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित आगरकरने या संघातून वर्ल्ड कपचा संघ देखील निवडला जाईल, असे विधान केले होते. अखेर अजित आगरकरने आज संघाची घोषणा केली आहे.

अशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघासोबत संजू सॅमसनला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आलं होतं. मात्र आता राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा सोबत अजित आगरकर यांनी केलेल्या चर्चेत संजू सॅमसनचं (sanju Samson) नाव वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसन बरोबर आणखीही दोन खेळाडूंना वगळण्यात आले आहे. आणि अखेर युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विनची संघात वापसी झालेली नाही.

हे खेळाडू बाहेर..

संजू सॅमसनला राहुलचा बॅकअप विकेटकीपर फलंदाज म्हणून निवडण्यात आलं होतं. मात्र केएल राहुलच्या (kl Rahul) अनुपस्थितीत पाकिस्तान विरुद्ध मिळालेल्या संधीचे सोनं ईशान किशनने (ishan Kishan) करून दाखवले. त्यामुळे संजू सॅमसनला भारताच्या विश्वचषक संघात संधी मिळाली नाही. संजू सॅमसन बरोबर जनगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्ना याला देखील वागळण्यात आले आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यावर आपली छाप सोडणाऱ्या तिलक वर्माला (Tilak Varma) देखील विश्वचषक संघात संधी मिळालेली नाही. T20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवला (suryakumar Yadav) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर गवसला नसला तरी देखील मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेत 15 सदस्यांमध्ये त्याचं नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

असा आहे विश्वचषकासाठी भारताचा पंधरा सदस्यीय संघ

फलंदाज आणि अष्टपैलू

रोहित शर्मा (कर्णधार) विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तर अष्टपैलू म्हणून, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, यांना संधी देण्यात आली आहे.

विकेट कीपर फलंदाज आणि गोलंदाज

विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल आणि ईशान किशनला संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीची कमान, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, यांच्या खांद्यावर असेल.

हे देखील वाचा PAK vs IND: या दिवशी पुन्हा रंगणार भारत पाकिस्तान थरार; पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल परतणार, या खेळाडूचा जाणार बळी..

NABARD Assistant Manager Recruitment 2023: या उमेदवारांना NABARD मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; तब्बल इतक्या जागा, पाहा पात्रता आणि निकष..

Acharya Chanakya Niti: ..म्हणून सुंदर मुलीशी चुकूनही लग्न करू नका; चाणक्यांनी सांगितलेल्या त्या तीन गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.