Cricket video Viral: रनआऊट झाला म्हणून राग आला अन् थेट पार्टनरच्याच डोक्यात घातली बॅट; पाहा धक्कादायक व्हिडिओ..
Cricket video Viral: क्रिकेट (cricket) हा खेळ संगिक खेळ आहे. संपूर्ण टीमने चांगला किंवा वाईट खेळ सादर केला, तरच तुमचा विजय किंवा पराजय होत असतो. तसंच एक धाव पूर्ण करण्यासाठी दोन्ही खेळाडूंनाही धावावे लागते. एक फलंदाज कितीही धावला तरी देखील धाव पूर्ण होऊ शकत. पार्टनरच्या चुकीमुळे अनेकदा फलंदाज रनआऊट होताना तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र पार्टनरने आपल्याला रन आउट केले, म्हणून त्याला कोणी मारत नाही.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट हा खेळ जवळपास सगळेच खेळतात. क्रिकेट हा खेळ अलीकडच्या काळात तेजीने लोकप्रिय होणारा खेळ म्हणून समोर आला आहे. सोशल मीडियावर वयोवृद्ध मंडळी क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फलंदाजाच्या चुकीमुळे नॉन स्ट्राइकरचा फलंदाज धावबाद होतो.
आपल्या पार्टनरच्या चुकीमुळे धावबाद झाल्यानंतर, आपण अनेकदा संताप व्यक्त करतो. गल्ली क्रिकेटमध्ये एकमेकांना शिव्या घातल्याचे, व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. मात्र बॅटने मारहाण केल्याचं कधीच पाहिली नसेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, देखील नॉन स्ट्राइकरचा खेळाडू बाद झाल्यानंतर, त्याला राग येतो.
धावबाद झाल्याने त्याला राग येतो, मात्र तो आपल्या पार्टनरला मारण्याच्या उद्देशाने हातातून बॅट भिरकावत नाही. आपला राग व्यक्त करण्यासाठी तो, जमिनीवर बॅट आदळतो. मात्र चुकून बॅट हातून सुटते. आणि स्ट्राइकवर फलंदाजी करत असणाऱ्या फलंदाजाच्या कपाळावर जाऊन आदळते.
— Movie And Cric (@MovieNCricEdits) August 25, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायला झालाय. अनेकांनी या व्हिडिओखाली कमेंट करताना फलंदाजाला कर्माचे फळ मिळाले, असे देखील म्हटले आहे. मात्र खेळात अशा घटना होत असतात. बॅट लागल्यानंतर, तो आपल्या पार्टनरकडे धावत गेल्याचे देखील या व्हिडिओ दिसत आहे. यावरून त्याच्या मनात असला घाणेरडा प्रकार आला नसल्याचं स्पष्ट होते.
हे देखील वाचा Arjun Kapoor: मलायका सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुन कपूर करतोय या विवाहित महिलेला डेट..
prithvi shaw: आता मी पोरीचा नाद सोडून विराट कोहली सारखी बॉडी करणार; पृथ्वी शॉच्या पोस्टने खळबळ..
Asia Cup 2023 1St match: वर्ल्ड कप सोडा, या चार चुकामुळे भारत आशिया कपही जिंकू शकणार नाही..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम