prithvi shaw: आता मी पोरीचा नाद सोडून विराट कोहली सारखी बॉडी करणार; पृथ्वी शॉच्या पोस्टने खळबळ..

0

prithvi shaw: भारताचा स्टार ओपनर सलामीवीर पृथ्वी सध्या दुखापतीमुळे आराम करतोय. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये त्याने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत द्विशतक झळकावले होते. मात्र एका सामन्या दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, आणि सध्या तो उपचार घेत आहे. 31 जुलैला त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. ज्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. (prithvi shaw Instagram Viral comment)

इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना पृथ्वी शॉने दमदार द्विशतक झळकावले. मात्र या द्विशतकापेक्षा जास्त चर्चा झाली, ती त्याच्या बॉडी शेमिंगची. त्याने दमदार द्विशतकाची खेळी केली. मात्र या खेळीचे कौतुक फारसं झालं नाही. त्याचे कारण म्हणजे, त्याचे शरीर. दमदार परफॉर्मन्स करून देखील फिटनेस अभावी सरफराज खानची निवड करण्यात आली नसल्याचं, निवड समिती कडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

साहजिकच त्यामुळे ‘पृथ्वी शॉ’ने केलेल्या दमदार खेळीमुळे देखील त्याचे चाहते त्याला भारतीय संघात स्थान मिळावे, यासाठी आवाज उठवताना दिसत नाहीत. पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल संघाने त्याला बाहेरचा रस्ता देखील दाखवला. मात्र अखेरच्या काही सामन्यात त्याला संधी देण्यात आली. त्यावेळी ‘पृथ्वी शॉ’ची गर्लफ्रेंड सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित देखील होती.

अर्धशतकानंतर ‘पृथ्वी शॉ’ने आपल्या गर्लफ्रेंडला फ्लाईंग किसही दिला. एवढेच नाही, तर त्याने सामन्यानंतर तिची प्रत्यक्ष विचारपूस देखील केली. आता पुन्हा एकदा पृथ्वीला त्याच्या गर्लफ्रेंडवरून सोशल मीडियावर चाहत्यांनी टोमणे मारले. पृथ्वी शॉने देखील चाहत्याने केलेल्या कमेंटला रिप्लाय दिला. ज्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

@Innocentpanditxtylish या इंस्टाग्राम युजरने कमेंट करताना लिहिले, “पृथ्वी भाई लड़की वड़की का चक्कर छोड़, और कोहली की तरह अपनी बॉडी को ट्रांसफॉर्म कर… जो जो प्रोसेस उसने किया था वो ही कर” चाहत्याच्या या कमेंटला पृथ्वी शॉने देखील “जी पंडित जी, जैसी आपकी आज्ञा” असं म्हणत दमदार रिप्लाय दिला.

पृथ्वी शॉने दिलेल्या कमेंट नंतर सोशल मीडियावर कमेंटला पूर आला. पृथ्वी देखील आता विराट कोहली सारखीच बॉडी करणार आहे. पोरीचा नाद सोडून, आता तो देखील विराट कोहली प्रमाणे बॉडीट्रान्सफॉर्म करणार असल्याच्या कॉमेंट येऊ लागल्या. पृथ्वी आता खरंच आपले वजन कमी करणार का? हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा Vastu Tips for Kitchen: किचनचे नियम माहिती असायलाच हवेत अन्यथा नेहमी वाद विवाद आणि कष्ट करूनही राहाल कंगाल.. 

Asia Cup 2023 IND vs PAK: ..म्हणून आशिया चषकात हे तीन खेळाडू अपयशी ठरले तर वर्ल्ड कपचा पत्ता होणार कट; BCCI चा प्लॅन तयार..

Asia Cup 2023 1St match: वर्ल्ड कप सोडा, या चार चुकामुळे भारत आशिया कपही जिंकू शकणार नाही..

face beauty: पार्लरमध्ये जाऊन चेहरा खराब करू नका; घरीच करा हे काम, चेहरा मेकअप पेक्षाही दिसेल चमकदार आणि सुंदर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.