face beauty: पार्लरमध्ये जाऊन चेहरा खराब करू नका; घरीच करा हे काम, चेहरा मेकअप पेक्षाही दिसेल चमकदार आणि सुंदर..

0

face beauty: सुंदर (beautiful) दिसायला कोणाला आवडत नाही. खास करून महिला इतरांपेक्षा आपला चेहरा सुंदर आणि चमकदार कसा दिसेल याचा विचार करत असतात. यामध्ये पार्लरला जाऊन आपला चेहरा उजळण्याची प्रक्रिया अनेक महिला पार पडतात. मात्र नियमितपणे पार्लरमध्ये जाण्याने तुमच्या चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य अधिक कमकुवत होते.

पार्लरमध्ये जाऊन चेहरा उजळवण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. मात्र पार्लरमध्ये नियमितपणे जाण्याने चेहऱ्याच्या सौंदर्यात तात्पुरत्या स्वरूपात भर पडते, हे खरं आहे. मात्र याचे गंभीर परिणाम चेहऱ्यावर होतात. अनेक केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे चेहरा लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. आणि म्हणून पार्लर सारखी चमक आणि सौंदर्य तुम्ही घरीच आणू शकता. (Steps To Get Clear Glowing Skin)

सतत पार्लरमध्ये जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. मेकअप करण्याने चेहरा देखील खराब होतो, शिवाय पैशा देखील जातो. याशिवाय कामाच्या व्यापामुळे वेळेची देखील मर्यादा असते. जर तुम्हाला या गोष्टींची चिंता असेल, तर तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही. घरच्या घरी काही टिप्स वापरून चेहऱ्याची काळजी घेतली तर चेहरा पार्लर पेक्षाही जास्त चमकू शकतो.

दिवसभर कामाच्या व्यापामुळे आपल्या चेहऱ्याला घाम येत असतो, मात्र आपण कोणताही विचार न करता घाम पुसण्यासाठी हाताचा वापर करतो. हातावर असणारे बॅक्टेरिया चेहऱ्यावर जमा होतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल येण्याचे प्रकार होतात. चेहऱ्यावर घाम येत असेल, तर तुम्ही हात रुमालाचा वापर करून चेहरा पुसू शकता.

चेहरा तुम्ही जितका नैसर्गिक ठेवता तितकेच चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलते. मात्र आपण नेमके याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. दिवसातून चेहरा किमान तीन वेळा धुणे आवश्यक आहे. सकाळी आंघोळ केल्यानंतर, तुम्ही चेहरा बारा वाजता एकदा धुवा. त्यानंतर, चारच्या आसपास, आणि रात्री न विसरता झोपण्यापूर्वी एकदा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढा.

आठवड्यातून किमान तीन वेळा चेहऱ्याची मसाज करणं फार आवश्यक आहे. चेहरा कोमट पाण्याने धुरल्यानंतर, तुम्ही चेहऱ्याची मसाज करा. चेहऱ्याची मसाज करताना फार जोर लावायचा नाही, याची आवर्जून काळजी घ्या. चेहऱ्याची मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्तभिसरण प्रक्रिया व्यवस्थित होते. आणि चेहरा तरुण दिसू लागतो.

स्क्रब करा

आठवड्यातून किमान दोनदा स्क्रब करणे देखील आवश्यक आहे. स्क्रब बाजारातून विकत घेण्यापेक्षा, तुम्ही घरच्या घरी बनवले तर जास्त फायदेशीर ठरेल. घरच्या घरी स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला बेसन पीठ, हळद लिंबाचा रस, थोडा जाड रवा, कोरफड, दही, मध इत्यादी पदार्थ मिक्स करून चेहऱ्याला व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचे आहे. सारे उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास तुमची त्वचा पार्लर पेक्षाही चमकदार आणि सौंदर्य प्रदान करते.

हे देखील वाचा Asia Cup 2023 India squad: ..म्हणून चहलची निवड केली नाही; अजित आगरकरच्या उत्तराने दिग्गजांचा संताप..

India squad for Asia Cup: दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात केएल राहुल खेळणार नाही; फीट नसतानाही राहुलच्या निवडीवर रोहित शर्माचे अजब वक्तव्य..

Chanakya Niti on husband wife: चाणक्यांनी सांगितलेकी ही धोरणे पाळा; पती-पत्नीमध्ये वाद होणारही नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.