Vastu Tips for Kitchen: किचनचे नियम माहिती असायलाच हवेत अन्यथा नेहमी वाद विवाद आणि कष्ट करूनही राहाल कंगाल..

0

Vastu Tips for Kitchen: प्रत्येकाने आपल्या घराची (home) कल्पना केलेली असते. आपल्या स्वप्नातलं घर उभा करण्यासाठी अनेक जण दिवस रात्र मेहनत देखील करतात. मात्र वास्तुशास्त्र (architecture) च्या नियमानुसार घर बांधले नाही, तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. अनेकांना यावर विश्वास बसणार नाही, कारण तर तुमच्यापैकी अनेक जण कष्टावर विश्वास ठेवून आयुष्य जगत असतात. मात्र वास्तुशास्त्रात घराच्या किचन विषयी विस्तृतपणे मांडणी करण्यात आली आहे. जी तुम्हाला माहिती असायला हवी.

वास्तुशास्त्रानुसार घरामधील किचन हे कधीही पायऱ्या खाली नसायला हवं. पायऱ्यांवरून येत जात असताना किचन मधील अन्न पायाखाली येते. आणि म्हणून वास्तुशास्त्रात पायऱ्याखाली किचन नसायला हवं, असं सांगण्यात आलं आहे. पायऱ्या बरोबर किचन हे टॉयलेटच्या खाली किंवा वरच्या बाजूला नसायला हवं. जर असं असेल, तर तुम्हाला नेहमी आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो, सोबतच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील धोक्यात येते. असं वास्तूशास्त्रात सांगितले आहे.

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये तुम्ही स्वयंपाक करत असताना, तुमचे तोंड दक्षिण दिशेला चुकूनही असायला नको. किचनमध्ये स्वयंपाक करताना तुमचे तोंड हे नेहमी उत्तर आणि पश्चिम या दोन दिशांकडे असायला हवं. उत्तर आणि पश्चिम दिशेला जर तुमचं तोंड असेल, तर घरातल्या सदस्यांवर नेहमी लक्ष्मीची कृपा राहते. स्वयंपाक झाल्यानंतर, दररोज किचन आणि गॅस साफ करणे आवश्यक आहे. तरच लक्ष्मीच्या घरात वास दरवळतो, असे देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं.

वास्तुशास्त्रात जेवण करण्याच्या पद्धतीवर देखील भाष्य करण्यात आलं आहे. जेवण करताना नेहमी तुमचं तोंड हे पूर्वेकडे असायला हवं. असं सांगण्यात आलं आहे. पूर्व ही दिशा ग्रहांची राजा त्याचबरोबर सूर्याची देखील दिशा असल्याने, सूर्य देवाची कृपा तुमच्यावर राहते.

घरातले किचन आणि गॅस हे बाहेरून कधीही दिसू नये. बाहेरून किचन दिसू नये, किचन नेहमी अशा जागेवर असायला हवं. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमचं किचन बाहेरून दिसत असेल, तर हा खूप मोठा गृहकलह मानला जातो. जेवताना नेहमी पूर्वेकडे तोंड करून जेवण करणे योग्य मानले जाते. याशिवाय ताटामध्ये अजिबातही अन्न शिल्लक ठेवू नये. असं देखील सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा Asia Cup 2023 IND vs PAK: ..म्हणून आशिया चषकात हे तीन खेळाडू अपयशी ठरले तर वर्ल्ड कपचा पत्ता होणार कट; BCCI चा प्लॅन तयार..

Asia Cup 2023 1St match: वर्ल्ड कप सोडा, या चार चुकामुळे भारत आशिया कपही जिंकू शकणार नाही..

face beauty: पार्लरमध्ये जाऊन चेहरा खराब करू नका; घरीच करा हे काम, चेहरा मेकअप पेक्षाही दिसेल चमकदार आणि सुंदर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.