Arjun Kapoor: मलायका सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुन कपूर करतोय या विवाहित महिलेला डेट..

0

Arjun Kapoor: बॉलीवूडच्या (Bollywood) अनेक सेलिब्रिटींचे (celebrity) खाजगी आयुष्य फारच रंजक राहिले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला देखील लाजवेल असं आयुष्य अर्जुन कपूर मलायका अरोरा Arjun (Kapoor and Malaika Arora) यांचे देखील आहे. मलायका अरोराच्या घटस्फोटानंतर अर्जुन कपूर मलयकाला डेट करू लागला. मलायका अरोरा आणि अरबाज खान या दोघांच्या घटस्फोटाला अर्जुन कपूरच जबाबदार असल्याचं बोललं जातं. आता पुन्हा एकदा अर्जुन कपूर आणि मलायका विषयी मोठी बातमी समोर आली आहे.

अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत होते. मात्र आता दोघांचा ब्रेकअप झाला असून, आता अर्जुन कपूरने आणखी एका विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे. अर्जुन कपूरच्या जीवनात आलेल्या विवाहित आणि घटस्फोटीत महिलेचे नाव कुशा कपिला (Kusha Kapila) असं आहे. ती एक कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

कुशा कपिला हिने या संदर्भात आपले मौन सोडले असले तरी, सोशल मीडियावर मात्र दोघेही चांगलेच ट्रेण्ड झाले. अर्जुन कपूर सोबतच्या नात्याविषयी बोलताना कुशा कपिला म्हणाली, यामध्ये काहीही तथ्य नाही. अशा अफवा ऐकून मला माझाच शोध घ्यायची वेळ आली आहे. कृपया या अफवा थांबवा. ही बातमी माझ्या आई पर्यंत गेली, तर तिला खूप मोठा धक्का बसेल, असं देखील ती म्हणाली.

म्हणून रंगल्या चर्चा..

अर्जुन कपूर आणि कुशा कपिला हे दोघेही करण जोहरच्या (karan Johar) घरी स्पॉट झाले होते. दोघांच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कुशा कपिला सोबत अर्जून कपूरला पाहण्यात आले. या दोघांसोबत मलायका नसल्याने, या चर्चा अधिक गडद झाल्या. याशिवाय या दोघांच्या डेटच्या चर्चा होण्याला आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. ज्यामुळे अनेकांचा दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या, चर्चांवर विश्वास बसू शकतो.

अर्जुन कपूर सोबत मलायकाचा ब्रेकअप…

गेली अनेक वर्ष अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर, आता दोघांचा ब्रेकअप झाला असल्याची माहिती आहे. या दोघांनी अधिकृतरीत्या आपल्या ब्रेकअपची घोषणा केली नसली तरी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी मात्र जोर धरला आहे. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा होत असताना, दुसरीकडे मलायकाने ‘Lets fall apart’ म्हणजेच, चला वेगळे होऊया, अशा नावाचा टी-शर्ट परिधान केला होता.

हे देखील वाचा prithvi shaw: आता मी पोरीचा नाद सोडून विराट कोहली सारखी बॉडी करणार; पृथ्वी शॉच्या पोस्टने खळबळ..

Vastu Tips for Kitchen: किचनचे नियम माहिती असायलाच हवेत अन्यथा नेहमी वाद विवाद आणि कष्ट करूनही राहाल कंगाल..

Asia Cup 2023 IND vs PAK: ..म्हणून आशिया चषकात हे तीन खेळाडू अपयशी ठरले तर वर्ल्ड कपचा पत्ता होणार कट; BCCI चा प्लॅन तयार..

Asia Cup 2023 1St match: वर्ल्ड कप सोडा, या चार चुकामुळे भारत आशिया कपही जिंकू शकणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.