ODI World Cup Ticket Rates: वर्ल्डकप सामन्यांचे तिकीट दर जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद..
ODI World Cup Ticket Rates: भारतामध्ये क्रिकेट (cricket) न पाहणाऱ्यांची संख्या शोधणे अवघड आहे. जवळजवळ प्रत्येकजण क्रिकेट पाहतो. हे अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. अनेकांना प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट पाहणं शक्य नसलं, तरी टीव्हीवर क्रिकेट मोठ्या प्रमाणात पाहिले जाते. क्रिकेट सामन्यांच्या तिकिटाचे दर जास्त असल्याने, अनेकांना प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहणे शक्य होत नाही. मात्र आता आगामी विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांचे तिकीट दर जाहीर झाले आहेत. (ICC world cup 2023)
50 षटकांचा विश्वचषक यावर्षी भारतामध्ये होणार असून, या स्पर्धेला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये खेळण्यात येणार आहे. 5 ऑक्टोंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा पार पडली जाईल. भारतामध्ये होणारी ही स्पर्धा विविध शहरांमध्ये पार पडणार आहे. ईडन गार्डन मैदानाबरोबरच इतर दहा मैदानावर ही स्पर्धा खेळवली जाईल. अशातच आता बंगाल क्रिकेट असोशियनने ईडन गार्डनवर (Eden garden) होणाऱ्या सामन्याचे दर जाहीर केले आहेत.
प्रत्यक्षात मैदानावर जाऊन क्रिकेट सामने पाहण्याचं अनेकांचे स्वप्न असतं. मात्र तिकिटाचे दर जास्त असल्याने, अनेकजण स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहत नाहीत. खासकरून मोठया आयसीसी स्पर्धेमध्ये तिकिटांचे दर जास्त ठेवले जातात. मात्र बंगाल क्रिकेट असोसिएशनने (Bengal cricket association) प्रत्येकाला स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता यावा, यासाठी खूप कमी तिकीट दर ठेवले आहेत.
बंगाल क्रिकेट असोसिएशनने ईडन गार्डन मैदानावर होणाऱ्या सामन्याचे तिकीट दर जाहीर करताना 630 रुपयांपासून पुढे ठेवले आहेत. याबरोबरच उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांना 900 रुपये खर्च करून सामना पाहावा लागणार आहे. ईडन गार्डन मैदानाच्या आसनाची क्षमता तब्बल 63 हजार 500 इतकी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणारा सामना त्याचबरोबर उपांत्य फेरीसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने अपर टियर आसनाकरिता 900 रुपये तिकीट दर ठेवला आहे. तर बी, एल ब्लॉक आसनाकरिता तीन हजार रुपये तिकीट दर असेल. या दोन सामन्याच्या व्यतिरिक्त या मैदानावर जे सामने होणार आहेत, त्यासाठी दीड हजार रुपये तर सीके ब्लॉक आसनासाठी अडीच हजार रुपये तिकीट दर असेल.
बांगलादेश विरूद्ध नेदरलँडमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी 650 रुपये (अपर टियर) तिकीट दर असेल. याबरोबरच डी आणि एच ब्लॉक करिता एक हजार रुपये तिकीट दर असणार आहे. बी,सी, के, एल, ब्लॉकसाठी दीड हजार रुपये दर असेल. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या दोन सामन्यासाठी (अपर टियर) आठशे रुपये तिकीट दर असणार आहे. तर डी,एच ब्लॉक करिता बाराशे रुपये तिकीट दर असणार आहे. C, K ब्लॉकसाठी 2 हजार 200 रुपये तिकीट दर असणार आहे.
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक
- भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८ ऑक्टोंबरला चेन्नईमध्ये होणार आहे.
- भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध 11 ऑक्टोंबरला दिल्लीमध्ये होणार आहे.
- भारताचा तिसरा सामना पाकिस्तान विरुद्ध 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे.
- भारताचा चौथा सामना बांगलादेश विरुद्ध 19 ऑक्टोबरला पुण्यामध्ये होणार आहे.
- भारताचा पाचवा सामना न्यूझीलंड विरुद्ध 22 ऑक्टोंबर धर्मशालामध्ये होणार आहे.
- भारताचा सहावा सामना इंग्लंड विरुद्ध 29 ऑक्टोबर लखनऊमध्ये होणार आहे.
- भारताचा सातवा सामना श्रीलंकेविरुद्ध दोन नोव्हेंबरला मुंबईमध्ये होणार आहे.
- भारताचा आठवा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5 नोव्हेंबरला कोलकत्तामध्ये होणार आहे.
- भारताचा नवा सामना नेदरलँड विरुद्ध 11 नोव्हेंबरला बेंगलोरमध्ये होणार आहे.
हे देखील वाचा Maharashtra politics: त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडिओ..
Tiger monkey video: माकडाने दोन वाघांना करून सोडलं सळो की पळो; व्हिडिओ पाहून बसाल डोळे चोळत..
Running Shoes For Men: या वेबसाइटवर ब्रँडेड रनिंग शूज मिळतायत निम्म्या किंमतीत..
smartphone buying tips: तुमचा स्मार्टफोन duplicate तर नाही? या पाच गोष्टी तपासून करा स्पष्ट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम