KCR Maharashtra Daura: इकडे महाराष्ट्रात पाय ठेवले, अन् तिकडे तेलंगणात खिंडार पडले..

0

KCR Maharashtra Daura: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) अनेक उलटफेर पाहायला मिळत असतानाच, तेलंगणाचे मुख्यमंत्री (Telangana CM) आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखी एक धक्क धक्का दिला. तेलंगणा राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, खासदार 300 गाड्यांचा ताफा घेऊन, विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या के. चंद्रशेखर राव यांना विठ्ठल पावला नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दोन दिवसाच्या या दौऱ्यात आपल्या नेत्यांसह ते पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. सोबतच दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके (Bhagirath bhalke) यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे. “अबकी बार किसान सरकार” (abki bar Kisan Sarkar) या घोषणेसह त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या स्वागतासाठी राज्यभरात ठिकठिकाणी बॅनर देखील लावण्यात आले आहेत. चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळ आणि आमदार खासदारासह हैद्राबाद सोलापूर मार्गाने पंढरपूरला दाखल झाले आहेत. एकीकडे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवले असतानाच, दुसरीकडे त्यांना तेलंगणात काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे.

एकीकडे चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे 20 पेक्षा जास्त पदाधिकारी आणि माजी मंत्री त्यांना सोनडून काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. तेलंगणाच्या जनतेचा विश्वास जिंकण्यात अपयश आल्याने, त्यांना तेलंगणा राज्य सोडून इतर राज्यात जावं लागत असल्याची टीका काँग्रेस मराठवाडाचे प्रभारी डॉ. एस. ए. संपत कुमार यांनी केली आहे.

मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun kharge) यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या यादीमध्ये भारत राष्ट्र समिती पक्षाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव, तसेच सध्याचे आमदार दामोदर रेड्डी, माजी आमदार गुरुनाथ रेड्डी यांच्यासह आणखी पाच माजी आमदार, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 हून अधिक पदाधिकार्यांचा समावेश आहे.

के चंद्रशेखर राव भाजपची बी-टीम

के चंद्रशेखर राव हे भाजपला पूरक भूमिका घेतात. भाजपला फायदा व्हावा, म्हणूनच ते महाराष्ट्रात निवडणुका लढवणार असल्याचं दिसतं. 300 गाड्यांचा ताफा, ठिकठिकाणी बॅनर, झेंडे इतकं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कोण खर्च करतंय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा Weather Update Today: हे चार दिवस पाऊस माजवणार हाहाकार; या जिल्ह्याना धोका..

Chanakya Niti Quotes: जवानीत या तीन गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही..

Viral video: ..होय लागोपाठ तीन मोटार सायकल अंगावरून जाऊनही चिमुकली वाचली; पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ..

Guru Purnima 2023: या राशींच्या लोकांचा सुरू होणार सुवर्ण काळ; जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व..

business idea: एकही रुपया न गुंतवता घरबसल्या या पाच ऑनलाईन व्यवसायातून करा लाखोंची कमाई..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.