Weather Update Today: ‘हे’ चार दिवस पाऊस माजवणार हाहाकार; ‘या’ जिल्ह्याना धोका..

0

Weather Update Today: गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातला शेतकरी (farmer) पावसाची आतुरतेने वाट पाहत बसला होता. यावर्षी महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल झाला. मात्र आता पाऊस महाराष्ट्रात जोरदार बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पावसा संदर्भात अपडेट दिली असून, चार दिवस मुसळधार (heavy) आणि अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. (Maharashtra weather update)

महाराष्ट्रात यावर्षी मानसूनने उशिरा हजेरी लावली असती तरी आता मुंबई (Mumbai) ठाणे (Thane) पालघर (Palghar) रायगड (Raigad) नवी मुंबई (Navi Mumbai) कल्याण (Kalyan) डोंबिवलीमध्ये (Dombivli) पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. सोलापूर (solapur) सातारा (Satara) जिल्ह्यामध्ये देखील पावसाने हजेरी लावली असून, काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 27 आणि 28 तारखेला जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27 आणि 28 तारखेला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दोन दिवसांमध्ये नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 27 आणि 28 जूनला अतिमुसळधार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळणार असून, नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला पुणे विभागाचे हवामान प्रमुख एस होसाळीकर (S Hosalikar) यांनी आपल्या ट्विटरवर या संदर्भात अपडेट दिली आहे.

या जिल्ह्यात ऑरेंज, येलो अलर्ट (yellow and Orange alert)

हवामान विभागाच्या अपडेट नुसार राज्यभरात 27, 28 आणि 29, 30 हे चारही दिवस ऑरेंज आणि येल्लो अलर्ट जारी केले आहेत. या चारही दिवसांमध्ये राज्यभरात अतीमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 29 आणि 30 जूनला पाऊस काही प्रमाणात विश्रांती घेऊ शकतो. मात्र हे दोन्ही दिवस येलो आणि ऑरेंज अलर्ट असणार आहे. येलो आणि ऑरेंज अलर्टमध्ये कोकण, विदर्भ, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा देखील काही भाग यामध्ये असणार आहे.

पुढच्या 48 तासांमध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पालघर, मुंबई, नवी मुंबई, कल्याण,ठाणे, डोंबिवली, वसई, बदलापूर, विरार, या शहारामध्ये पाऊस सातत्याने पडणार असून, पुढचे 48 तास देखील अशीच परिस्थिती असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पालघर, मुंबई, नवी मुंबई, कल्याण,ठाणे, डोंबिवली, वसई, बदलापूर, विरार, या शहरांबरोबर सातारा आणि पुणे तसेच नाशिकमध्ये देखील पुढच्या 48 तासात मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात देखील काही भाग वगळता अशीच परिस्थिती असणार आहे.

हे देखील वाचा Viral video: ..होय लागोपाठ तीन मोटार सायकल अंगावरून जाऊनही चिमुकली वाचली; पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ..

Chanakya Niti Quotes: जवानीत या तीन गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही..

Guru Purnima 2023: या राशींच्या लोकांचा सुरू होणार सुवर्ण काळ; जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व..

Dog Viral video: शिकार करायला गेलेल्या कुत्र्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम; पाहा गाढवाचा पराक्रम..

Sarfaraz Khan: मुसलमान हाच त्याचा दोष? सरफराजची कसोटी संघात निवडत होत नसल्याने गावस्करांचा संताप, पाहा काय म्हणाले गावस्कर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.