Viral video: ..होय लागोपाठ तीन मोटार सायकल अंगावरून जाऊनही चिमुकली वाचली; पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ..

0

Viral video: सोशल मीडिया (social media) हे व्हायरल व्हिडिओंचे व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओ दररोज व्हायरल होतात. काही व्हिडिओ इन्स्पायर करणारे असतात. तर काही व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकतो. तर काही इमोशनल देखील असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांना विश्वासही बसणार नाही.

रस्त्यावरून जाताना एखाद्या टू-व्हीलरचा धक्का जरी लागला, तरी अनेकदा जीव जातो. याविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका चिमुकलीला चक्क तीन गाड्यांनी धडक देऊन देखील ही चिमुकली जिवंत राहिली. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी ते हेच.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक फॅमिली रस्त्याच्या कडेला उभी असल्याचं दिसत आहे. रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहनांची ये जा सुरू आहे. अशातच अचानक एक चिमुकली रस्त्याच्या पलीकडे धावताना दिसत आहे. चिमुकली रस्ता क्रॉस करत आहे, हे पालकांच्या लक्षात देखील येत नाही.

मुलगी रस्त्याच्या मध्यभागी आल्यानंतर, अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या एका मोटरसायकलीला चिमुकली धडकते. मोटरसायकलला मुलगी धडकतानाचा प्रसंग पाहून, तुमच्या काळजाचा ठोका देखील चुकू शकतो. मोटरसायकलला मुलगी धडकल्यानंतर, रस्त्यावर कोसळते. त्याच मोटरसायकल पाठीमागे येणारी आणखी एक मोटर सायकल चिमुकलीला धडक देऊन जाते.

चिमुकलीला लागोपाठ दोन्ही मोटरसायकलीने धडक दिल्यानंतर, तिसरी मोटर सायकल देखील चिमुकली जवळून जाते. मात्र तिसऱ्या मोटार सायकलचा स्पर्श चिमुकलीला होताना दिसत नाही. आश्चर्य म्हणजे, एवढं होऊन देखील मुलगी जिवंत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतं.

या अपघातानंतर, मुलीचे पालक तिला उचलून घेऊन जातात. चिमुकलीला इजा झाली असणार हे नक्की. मात्र इतक्या मोठ्या अपघातातून ती वाचणं हीच मोठी गोष्ट आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ Mystik_33 या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला.

हे देखील वाचा Best Smartphones Under 8k: या ठिकाणी मिळतायत 8 हजारात पाच दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या लगेच..

Dog Viral video: शिकार करायला गेलेल्या कुत्र्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम; पाहा गाढवाचा पराक्रम..

Sarfaraz Khan: मुसलमान हाच त्याचा दोष? सरफराजची कसोटी संघात निवडत होत नसल्याने गावस्करांचा संताप, पाहा काय म्हणाले गावस्कर..

Health Tips: पाणी पिण्याच्या या तीन आहेत सर्वात घातक वेळा; वेळीच थांबला नाहीत तर..

Chanakya Niti: मार्ग कितीही खडतर असू द्या, फक्त चाणक्याचे हे शब्द ध्यानात ठेवा; यश लोटांगण घालेलच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.