Sarfaraz Khan: मुसलमान हाच त्याचा दोष? सरफराजची कसोटी संघात निवडत होत नसल्याने गावस्करांचा संताप, पाहा काय म्हणाले गावस्कर..

0

Sarfaraz Khan: आगामी वेस्टइंडीज दौऱ्यावर (IND vs West Indies tour) भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची निवड करण्यात आली आहे. कसोटी संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या सरफराज खानला (sarfaraz Khan) मात्र संधी मिळाली नाही. सरफराज खानला भारताच्या कसोटी संघात स्थान न मिळाल्याने अनेक दिगाजांनी आता बीसीसीआयचे (BCCI) कान उपटले आहेत. (Why Sarfaraz Khan not Indian test team)

क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला राजकारणाचा सामना करावाच लागतो. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवायचं अनेकांचे स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाला हे शक्य होत नाही. अनेकदा अधिक गुणवत्ता असून, देखील खेळाडूंना जाणीवपूर्वक डावललं जातं. परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत इतर खेळाडूंना लवकर संधी मिळते.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने खोराने धावा काढणाऱ्या सरफराज खानला पुन्हा एकदा भारतीय निवड समितीने डावलले आहे. सर्फराज खानला भारताच्या कसोटी संघात स्थान न मिळाल्याने, आता आकाश चोप्रा (Aakash Chopra) आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी देखील निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.

बीसीसीआयने स्पष्ट करावं, सरफराज खानमध्ये कोणती गोष्ट आहे जी बीसीसीआयला खटकत आहे. बीसीसीआयने आता जाहीर करावं सरफराज खान मधील कोणती गोष्ट आवडत नाही. इतर खेळाडूंपेक्षा सर्फराज खानची सरासरी चांगली आहे. तरीदेखील त्याला डावडल्याचे कारण काय आहे? हे बीसीसीआयने आता स्पष्ट करायला हवं. अशी टीका आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चैनलवर बोलताना केली आहे.

भारतीय संघात खेळाडूची निवड रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर होत नसेल, तर रणजी स्पर्धा कशाला खेळायची? असं म्हणत, सुनील गावस्कर यांनी देखील निवड समिती आणि बीसीसीवर ताशेरे ओढले आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सरफराज खानने आणखी काय करायला हवं. सरफराज खानची निवड भारतीय कसोटी संघात व्हायला हवी होती. असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

फर्स्ट क्लास कारकीर्द 

सरफराज खानने आतापर्यंत मुंबई संघाकडून खेळताना एकूण 37 फर्स्ट क्लास सामन्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 37 सामन्यात एकूण 54 डावात त्याने फलंदाजी केली असून, यामध्ये जवळपास 80 च्या सरासरीने तीन हजार पाचशे पाच धावांचा डोंगर उभा केला आहे. यात तब्बल 13 शतकांचा तर 9 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

सरफराज खानची भारतीय कसोटी संघात निवड न झाल्याने आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नेटकर्यांनी सरफराज केवळ मुसलमान असल्यानेच त्याची भारतीय कसोटी संघात निवड होत नाही की काय? असा प्रश्न

उपस्थित केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.