Guru Purnima 2023: ‘या’ राशींच्या लोकांचा सुरू होणार सुवर्ण काळ; जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व..

0

Guru Purnima 2023: गुरु पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक यशस्वी मानवी जीवनामध्ये गुरुचा हात हा असतोच. गुरुच्या आशीर्वादा शिवाय यश प्राप्त करणे शक्य नाही. गुरुपौर्णिमा हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आपल्या गुरुला भेट देण्यासाठी शिष्य या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. (Guru Purnima importance in life)

आषाढी महिन्यांमध्ये येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं. याशिवाय व्यास पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, अशा देखील नावाने ओळखलं जातं. गुरु पौर्णिमेदिवशी आपल्या गुरूंना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याचे काम केले जाते. या दिवशी आपल्या गुरुची आवर्जून भेट घेऊन आशीर्वाद घेतले जातात. आज आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजून घेणार आहोत. सोबतच कोणत्या राशींना गुरुपौर्णिमेचा शुभ लाभ होणार आहे, हे देखील जाणून घेणार आहोत. (guru purnima 2023 auspicious yoga)

यावर्षी गुरुपौर्णिमा तीन जुलैला सोमवारी आली आहे. पंचागानुसार 3 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा अनेकांसाठी शुभ आहे. इंद्र त्याचबरोबर बुधादित्य राजयोग, ब्रह्मयोग असे तीन योग या वर्षीच्या गुरु पौर्णिमेला जुळून आले असून, गुरुपौर्णिमेपासून या राशींचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे.

या दिवशी गुरु दीक्षा कशी घ्यावी? 

अनेकांना गुरुपौर्णिमेला दीक्षा कशी घ्यायची याविषयी माहिती नसते. जर तुम्हाला गुरु नसेल, तर तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंना आपले गुरु बनवून त्यांचा जप करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेदिवशी भगवान विष्णूची प्रार्थना, पूजा केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. सोबतच जर तुम्ही तुमच्या गुरूकडून दीक्षा घेत असाल, तर गुरुने सांगितलेला मंत्र तुम्ही अकरा वेळा उच्चारून त्याचा जप करणे आवश्यक आहे.

गुरु दोषावर उपाय

गुरु पौर्णिमेदिवशी अनेकांना गुण दोष असतो. तुम्हाला गुणदोष असेल, तर तुम्ही केशर, हरभरा डाळ, पिवळे वस्त्र, हळद, पितळेची भांडी, अशा वस्तू गरिबांना दान करणे आवश्यक आहे. या दिवशी ब्राह्मणांना देखील दान केल्याने तुमचा गुण दोष नाहीसा होतो. या दिवशी तुम्ही अन्नदान केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

या’ राशींना होणार लाभ

जर तुमची रास सिंह असेल, तर तुम्हाला गुरुपौर्णिमेदिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीचा लोकांना गुरु पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी धनलाभ होणार असून, तुमच्या क्षेत्रांमधील एखादी चांगली बातमी देखील तुम्हाला मिळू शकते. नोकरीत बढती, व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius)

धनु या राशीच्या लोकांना देखील गुरुपौर्णिमेचा दिवस हा खूप शुभ आहे. या दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रमधील उत्तम बातमी तुम्हाला समजू शकते. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमच्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाचा आणि लाभदायक असणार आहे.

मिथुन (Gemini)

ज्या मनुष्याची रास मिथुन आहे, अशा मनुष्याच्या आयुष्यात गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून भरभराटी यायला सुरुवात होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये देखील सुधारणा होणार आहे.

हे देखील वाचा Viral video: ..होय लागोपाठ तीन मोटार सायकल अंगावरून जाऊनही चिमुकली वाचली; पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ..

Dog Viral video: शिकार करायला गेलेल्या कुत्र्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम; पाहा गाढवाचा पराक्रम..

Viral Video: ती एक चूक अन् तरुण कोसळला खोल दरीत; कोणीच नाही केली मदत, पाहा व्हिडिओ..

Sunil Gavaskar: ..म्हणून निवड समिती बरोबर रोहित विराटला सुलील गावस्करांनी लगावली चपराक; वाचा काय म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.