Sunil Gavaskar: ..म्हणून निवड समिती बरोबर रोहित विराटला सुलील गावस्करांनी लगावली चपराक; वाचा काय म्हणाले..

0

Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेट (Indian cricket) संघ सध्या खडतर प्रवासातून जात आहे. गुणवत्ता असून देखील महत्वाच्या सामन्यात परफॉर्मन्स (performance) येत नसल्याने, अनेकांकडून भारतीय क्रिकेट संघाला (Indian cricket team) टीका सहन करावी लागत आहे. 12 जुलैपासून भारतीय क्रिकेट संघाला वेस्टइंडीज (IND vs WI) बरोबर दोन कसोटी (2test match) सामन्याची मालिका खेळायची आहे. या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली असून, या निवडीवर सुनील गावस्कर यांनी कठोर शब्दात टीका करताना अनेकांचे काम उपटले आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी अनेक भारतीय तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) मुकेश कुमार (Mukesh Kumar) ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) या तरुण खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2023) भारताच्या झालेल्या दारुण पराभवामुळे संघात काही बदल होणार असल्याची चर्चा होती. मात्र या संघात फारसे बदल झाले नसले तरी चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले.

भारताच्या कसोटी संघातून चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आल्यानंतर, आता सुनील गावस्कर (sunil gavaskar) यांनी संघ निवडीवर टीका केली आहे. एवढेच नाही, तर विराट कोहली (Virat kohli) आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) देखील धारेवर धरलं आहे. एवढंच नाही तर टीका करताना सुनील गावस्कर म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात संपूर्ण फलंदाजी अपयशी ठरली होती. शिवाय अजिंक्य राहण्याच्या. असं असताना केवळ त्याला बाहेर करणे, हे न समजण्यापलीकडेच आहे. अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाची पूर्ण फलंदाजी अपयशी ठरली होती. केवळ अजिंक्य रहाणेने चांगली फलंदाजी केली. मात्र असं असताना केवळ पुजाराला बाहेरचा रस्ता का दाखवला? असा सवाल उपस्थित केला. मात्र त्याला कमबॅक कसं करायचं, हे माहिती आहे. ˈकाउन्टी क्रिकेट खेळून तो अनेकदा स्वतःला सिद्ध करतो. पुनः एकदा करेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) त्याने धावा केल्या नाहीत, म्हणून त्याला बाहेर करण्यात आलं. तर मग रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी देखील धावा केल्या नाहीत, त्यांचं काय? असा प्रश्न देखील सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला. वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची झालेली निवड योग्य नसल्याचे मत नोंदवत निवड समितीवर टीका केली.

निवड समिती बरोबर विराट कोहली आणि रोहित शर्मावर टीका करताना सुनील गावस्कर यांनी आकडेवारी देखील इंडिया टुडे ग्रुपशी बोलताना सांगितले. गावस्कर म्हणाले, जर चेतेश्वर पुजारा 14 आणि 27 अशा दोन्ही डावामध्ये अपयशी ठरला. मात्र त्याच्या बरोबरच विराट कोहली, आणि रोहित शर्मा हे दोघेही अपयशी ठरले आहेत. विराट कोहलीने पहिल्या डावामध्ये 14 आणि 49 तर रोहित शर्माने 15 आणि 43, शुबमन गिल 13 आणि 18 धावा केल्या आहेत. मात्र असं असताना केवळ पुजाराला बाहेर करणे हे योग्य नाही.

हे देखील वाचा why men weight increase after marriage: म्हणून त्या कारणामुळे लग्नानंतर पुरुषांना सुटते ढेरी..

Job Opportunities: 88 हजार तरुणांना नोकरी; सरकारच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हीही करा लगेच अर्ज..

Ration Card: धान्य घेण्यासाठी आता रेशन कार्डची आवश्यकता नाही! फक्त करा हे काम..

Mumbai News: लग्नाला न बोलवता जेवायला जाताय का? ही बातमी तुमच्यासाठी आहे; कारण तरुणांची झाली अशी अवस्था..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.